spot_img
spot_img

धानोरा साबलखेड व देवीनिमगांवने संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहाची परंपरा कायम ठेवली – मा.आ.भिमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी)तालुक्यातील धानोरा, साबलखेड व देवीनिमगाव येथील भाविकांनी संत बाळूदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू ठेवली त्याबद्दल खरोखरच ही बाब भाविकांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे असे अपक्ष उमेदवार व माजी आ. भीमराव धोंडे यांनी देवी निमगाव येथे सांगितले.


धानोरा, देवी निमगाव व साबलखेड येथे संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या दिवशी होत असतो. माजी आ. भीमराव धोंडे यांनी देवी निमगाव येथे सदिच्छा भेट दिली. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संदीप मार्कंडे यांनी सत्कार केला यावेळी शिवाजी पोफळे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, पं. स. सदस्य डॉ मनोज पाचे, विठ्ठल काकडे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की, संत बाळूदेव महाराज हे या भागातील महान संत होते. पाटोदा येथील भव्य इमारत असलेल्या शाळेला आपण संत बाळूदेव महाराज यांचे नाव दिले आहे. माझे व संत बाळूदेव महाराजांचे चांगले स्नेहाचे संबंध होते या परिसरात त्यांनी चांगले धार्मिक कार्य केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच या भागातील ग्रामस्थांनी संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा कायम चालू ठेवली आहे त्याबद्दल भाविकांचे कौतुक करायला पाहिजे. आष्टी तालुक्यातील धानोरा, साबलखेड, देवीनिमगाव येथे संत बाळूदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हि चांगली परंपरा या भागातील नागरिकांनी जपली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!