spot_img
spot_img

कृषी महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थ्यांचे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धा २०२४ मध्ये लोकनृत्य स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले

आष्टी (प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ (कलारंग) आयोजन चे २७ व २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये कृषी महविद्यालय, लातूर येथे करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठा अंतर्गत असणाऱ्या १७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथील विदयार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला. त्यामध्ये लोकनृत्य,स्कीट, माईम, गीत यांचा समावेश होता. या स्पर्धेतील लोकनृत्य स्पर्धे मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी कलाकारांनी अस्सल पारंपरिक रांगडा लेझिम नृत्य प्रकार सादर करून द्वितीय पारितोषक (रोप्य पदक) पटकावले. असे अतुलनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव लौकिक केले.

आनंद चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.भीमरावजी धोंडे साहेब तसेच सहसचिव डॉ. अजयदादा धोंडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्रशासकिय अधिकारी डॉ. डी. बी.राऊत ,महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सत्र परीक्षा चालू असतानाही सहभागी विद्यार्थ्यांनी वेळेत वेळ काढून सराव केला व हे यश संपादन केले. महाविद्यालयाचे नाव विद्यापीठांमध्ये लौकिक केले. विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी व सरावासाठी दिलेली वेळ याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य व सर्व कर्मचारी यांनी धन्यवाद व्यक्त केले. प्रशिक्षक श्री.जावेद शेख, परभणी यांचे विशेष करून या विद्यार्थ्यांना सराव तसेच नृत्य प्रकार सादरीकरणासाठी बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. जावेद सरांनी जास्तीचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट सराव करून घेतला. यामुळेच हे यश संपादन झाले. प्रशिक्षक जावेद सर यांचे महाविद्यालय यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले. या स्पर्धेत विद्याथ्यर्थ्यांनी सहभागी होऊन यश मिळविण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एल. बनकर,प्रा. बी.आर.गुंजाळ, प्रा.बी.एन.उके,प्रा.डी.सी.सातव, प्रा.ए.एम.म्हस्के व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!