spot_img
spot_img

पाथर्डी शहरात पोलिस व सशस्त्र सीमा बल यांचे संयुक्त सशस्त्र पथसंचलन व शक्ती प्रदर्शन

पाथर्डी (प्रतिनिधी):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरामध्ये आज पाथर्डी पोलीस व एस.एस.बी. अर्थात सशस्त्र सीमा बलाच्या जवानांच्या वतीने विभागीय पोलीस अधीक्षक सुनील पाटील, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एस.एस.बी.चे वरीष्ठ अधिकारी विपीन कुमार व विजय पाल यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पथसंचलन करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दि. २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी शहरातील विविध भागातून हे सशस्त्र पथसंचलन पार पडले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व ३० पोलीस कर्मचारी आणि एस. एस. बी. सशस्त्र सीमा बल या भारतीय केंद्रीय सुरक्षा दलाचे ५० जवान यांनी संयुक्तपणे शहरातील नगर रोड, नाईक चौक, चिंचपूर रोड, मेन रोड, नवी पेठ, आंबेडकर चौक, कोरडगाव रोड, शेवगाव रोड आदी प्रमुख मार्गावरून आणि विविध भागातून मार्गक्रमण करत हे संचलन काढले.
आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी. शांतता रहावी. सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित व भयमुक्त वाटावे तसेच निवडणूकी दरम्यान काळात होणारे सभा, प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी या करिता पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. समाज विघातक शक्ती व समाज कंटकांना चाप बसावा याकरिता सदरचे पथसंचलन करण्यात आलेले आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ, पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड, सचिन पोटे, सुहास गायकवाड, अमोल लबडे, देविदास तांदळे, प्रकाश बडे, महेश रुईकर, राम सोनवणे, संदीप कानडे आदी सहभागी झाले होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!