आष्टी (प्रतिनिधी)विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर गिर्हे यांनी दत्त हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पिंपरी घाटा येथे हनुमान मंदिरासमोर झाला डॉक्टर गिर्हे यांनी दत्त हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा हे आरोग्यसेवेतील त्यांचे सर्वात मोठे पाऊल आहे त्याचा फायदा अनेक गरजूंना होईल या लोकार्पण सोहळ्याला पिंपरी घाटा व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते समाजाप्रती सेवाभावी वृत्ती ठेवून डॉक्टर गिर्हे यांनी घेतलेला रुग्णवाहिका लोकार्पणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे त्यामुळे गरजू लोकांना फायदा होऊन अत्यावश्यप्रसंगी तत्काळ सेवा उपलब्ध होणार आहे त्यामुळे निश्चितच असे लोकाभिमुख उपक्रम राबवणे गरजेचे आहे या रुग्णवाहिकेमुळे गावागावापर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध होणे शक्य होणार आहे अपघात स्थळी किंवा एखाद्या आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमी किंवा आजारी लोकांना हॉस्पिटल पर्यंत आणणे सोपे होणार आहे रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध राहणार आहे डॉक्टर गिर्हे यांनी नेहमीच रुग्णांना चांगली सेवा दिली आहे कोरोना काळात देखील यांनी रुग्णसेवेचा वसा चालू ठेवला दिवस असो वा रात्र ते कायमच रुग्णसेवेसाठी 24 तास उपलब्ध असतात