spot_img
spot_img

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरात मी केलेले विकास कामे आणि आजी माजी आमदारांनी केलेली कामे याचा हिशोबच होऊन जाऊ द्या..i माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे आव्हान.. मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरात 22 कोटी रु.च्या विकास कामांचा शुभारंभ…

आष्टी (प्रतिनिधी) नाथ संप्रदायातील अग्रणी असलेले श्री.मच्छिंद्रनाथ देवस्थान हे संपूर्ण भारत देशातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून या गडाची सेवा करण्यासाठी विश्वस्त मंडळामध्ये पदसिद्ध विधानसभा सदस्य असावा या उदात्त हेतूने आपण काम सुरू केले असून मी केलेली विकास कामे आणि गेल्या दहा वर्षातील माजी आणि आजी आमदारांनी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे केलेल्या विकास कामांचा एकदा हिशोब होऊन जाऊ द्या असे आव्हान माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी यांनी दिले

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड परिसरातील 20 कोटी 35 लक्ष रुपये यांच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते..
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी ॲड.
साहेबराव मस्के, ह.भ. प.भानुदास महाराज मस्के, ह.भ.प.अशोक महाराज मरकड, घाटशीळ पारगाव येथील सरपंच वैजनाथ खेडकर, सावरगावचे सरपंच पंढरीनाथ चंदनशिव, कार्यकारी अभियंता पान संबळ, उप अभियंता सौदागर, शाखा अभियंता बादाडे, कानिफनाथ गडाचे विश्वस्त ताठे पाटील, देवस्थानचे अध्यक्ष चितळे सर, सचिव बाबासाहेब मस्के, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे आज मराठी वृत्तवाहिनीचे संपादक अविशांत कुमकर गणेश दळवी शरद रेडेकर सचिन रानडे इत्यादी उपस्थित होते..

पुढे बोलताना माजी राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले की,
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान हे संपूर्ण भारतभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असून भाविकांची या ठिकाणी गैरसोय असल्यामुळे..विकासकामांची आवश्यकता असताना आपण या गडाचे विश्वस्त म्हणून काम सुरू केले असून आता हे देवस्थान देशपातळीवरील सर्व संविधांयुक्त पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला संकल्प असून विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी अनेक विकास कामे सुरू असून त्यातील मच्छिंद्रनाथ गड ते शेंडगेवाडी रस्ता ४.०० कोटी रु.,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सावरगाव ते मच्छिंद्रनाथ गड रस्ता ४.०० कोटी रु.चा अत्यंत दर्जेदार विस्तीर्ण असा रस्ता १.७५ कोटी रू.चा मच्छिंद्रनाथ गड ते पत्र्याचा तांडा सरहद्द पर्यंत रस्ता ३.३० कोटी रू.
प्रसादालय इमारत बांधकाम २.०० कोटी रु. शौचालयासाठी१.७५ कोटी रु.
वाहनतळ अद्ययावत करणे २.०० कोटी रु.
भक्तनिवास स्वच्छतागृह संरक्षण भिंत ५.००कोटी रु.
परिसरातील पाण्याचा तलाव सुधारणा करणे १.०० कोटी रु. अशा एकूण २० कोटी 35 लाख रु. किमतीच्या विकास कामांचा या कामांचा आज शुभारंभ होत असून आपण सतत वंचित घटकाकडे लक्ष देत असल्यामुळे वेलतुरी हे गाव डोंगरी विकास क्षेत्रात येत असून देखील त्या ठिकाणी विकासाचा निधी कुठे गेला ? असा सवाल करून आता आपण वेलतुरी ते वृद्धेश्वर हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 20 कोटी रुपये मंजूर करून घेतले असून त्यातून 7.50 मीटर एवढा रुंद अत्यंत दर्जेदार असा रस्ता होणार असल्यामुळे या ठिकाणची रहदारी सुरळीत होणार आहे क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा मी विधानसभा सदस्य या नात्याने विश्वस्त कधी आलो मात्र वीस 14 मध्ये आपला पराभव झाला त्यानंतर 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या कालावधीमध्ये विधानसभा सदस्य असलेल्या दोन्ही आमदारांनी केवळ एक एक बैठकीला हजेरी लावली आहे यावरून त्यांना देवस्थानाच्या विकासाविषयी किती गांभीर आहे हे लक्षात येते माझ्या काळात केलेल्या विकास कामांची आणि गेल्या दहा वर्षातील विकास कामांची एकदा तुलना होऊन जाऊ द्या असे सांगत त्यांनी तुलनात्मक चर्चा व्हावी असे आव्हान दिले सध्या काम कमी आणि बोर्ड जास्त दिसतात आपण कामे मंजूर करतो परंतु शुभारंभाच्या नारळ फोडण्याचा नाद आपल्याला कधीच नव्हता सुरुवातीला देवस्थानगडाच्या मालकीची 19 गुंठे एवढी जमीन असताना आज 125 एकर जमीन देवस्थानच्या मालकीची विकत घेण्यात आहे त्यातून अत्यंत अद्ययावत देशपातळीवर चर्चा होते असे अत्याधुनिक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे असे सांगत ते पुढे म्हणाले की मच्छिंद्रनाथ देवस्थान परिसरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग सारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी अद्ययावत अभ्यासिका बांधकाम करण्यात येणार असून त्याचे त्यासाठी 2.00 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना आता नगर पुणे मुंबई या ठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत ग्रामीण भागात भागातील अभ्यासू आणि हुशार विद्यार्थ्यांना ही मोठी संधी निर्माण होणार आहे असे त्यांनी सांगितले संपूर्ण भारत देशातील भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्यासाठी दूरवरील भावी भक्तांसाठी हेलिपॅड आणि छोटे विमान स्थळ उभारण्याचा प्रयत्न सुरू असून मोठे मोठे दानशूर भक्तांना या मुळे मोठी सुविधा मिळणार आहे मंदिर परिसरातील गाभारा पाच कोटी 75 लाख रुपये किंमत असलेला गाभारा बांधकामाचे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी भूमिपूजन भाविक भक्तांचे हस्ते करण्यात येणार आहे असे सांगत दसरा मेळाव्यामध्ये आपण विकास कामांविषयी आणि इतर बाबींबाबत भाष्य करणार आहोत असे सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभामध्ये एडवोकेट साहेबराव मस्के यांनी आमदार अनेक असतात परंतु सुरेश धस यांच्यासारखे प्रयत्नवादी आणि कठोर परिश्रम करणे आमदार कमी आहेत विकासाद्वारे गावांचा कायापालट करणे म्हणजे काय असते हे फक्त सुरेश धस यांनीच दाखवून दिलेले असून महायुती चा उमेदवार कोणीही असो परंतु सुरेश धस हेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासाचे शिल्पकार आहेत हे निर्विवाद सत्य असल्याचे सांगत संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील जनतेने उघडा डोळे बघा नीट या पद्धतीने या विकास कामांकडे पाहावे असे सांगितले यावेळी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील विकास कामे मंजुरी बद्दल सद्गुरु सेवा मंडळ आष्टी यांचे वतीने माजी राज्यमंत्री सुरेश धस आणि सावरगाव गावातील सभा मंडपाचे 30 लक्ष रुपये मंजूर असून गावकऱ्यांच्या आग्रहावरून 45 लाख रुपयांचे काम करणाऱ्या दादासाहेब यांचा सत्कार करण्यात आला

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!