आष्टी(प्रतिनिधी):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आज शेरी बु येथे सवांद दौरा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जयदत्त धस बोलत असताना युवकांच्या अडीअडचणी,गावातील समस्या समजून घेतल्या तसेच मूलभूत सुविधा लाईट, रस्ता,शाळा अशा अनेक विषयावर चर्चा करून त्यावर संबंधित अधिकारी यांना फोन करून तात्काळ सोडवण्यास सांगितले. पुढे बोलताना जयदत्त धस म्हणाले की आमचे कुटुंब हे जातीपातीच्या पलिकडे जाऊन सर्वांच्या सुखादु:खात सतत पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे काम करत आहे, राजकीय पटलावर काम करत असताना गेले पंधरा वर्षांपासून मतदार संघातील प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वर्षभर चोवीस तास मा.आ.धस आण्णा उपलब्ध असतात , विशेष म्हणजे शेरी गावावर आण्णा चे जास्त प्रेम असून आतापर्यंत सरपंच संदिप खाकाळ यांच्या पाठपुरावाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचे कामे दिली असून त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे प्रगती पथावर आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही मतदान रूपाने आशीर्वाद द्या आम्ही नक्कीच त्यातून उतराई होण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास जयदत्त धस यांनी दिला.
➡️ आ.सुरेश धस म्हणजे शास्वत विकास :- सरपंच खाकाळ
गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळेचा प्रश्न प्रलंबित असताना अनेकदा त्याविषयी निवेदन दिले अनेक आंदोलन केले परंतु त्याला यश आले नाही, याबाबत आम्ही शाळा खोल्याचा विषय आ.धस आण्णा जवळ काढला अन त्यांनी ताबडतोब शाळा खोल्यासाठी जिल्हा नियोजन योजने अंतर्गत चाळीस लक्ष रुपये मंजूर केले, ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यावेळी जयदत्त धस यांनी शाळा खोल्यांची पहाणी करून सरपंच खाकाळ व ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी गणप्रमुख अस्लम सय्यद,प्रदीप बांदल,महेश खाकाळ,राजू रासकर, श्रीराम सोनवणे, राहुल गोरे,शिवाजी डोरले,परशुराम शिरोळे, निलेश महाडिक, सुखदेव महाडिक,अक्षय गोरे, अक्षय कर्डीले,राजू जाधव किशोर सोनवणे, बाळू खाकाळ, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
➡️ आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून गावात परिवर्तन घडवून आणायचे असेल गावातील तरूणांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहून अण्णाचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन महेश खाकाळ यांनी केले