पाथर्डी (प्रतिनिधी) :- पाथर्डी शेवगाव मतदार संघामध्ये विकास कामे अर्धवट आहेत ती पूर्ण न करता त्या कामाची उद्घाटने व हारतुरे नारळ घेणे आमदारांनी बंद करावीत. जर कामच पूर्ण नाही तर हार नारळ कुणाचे व कशासाठी घेताय. तुम्हाला खरंच जर जनतेचा कळवळा असता तर भगवानगड पाणी योजना अगोदर पूर्ण केली असती आणि पूर्ण करून पाणी आल्यावरच सत्कार घेतला असता. आज जर मतदारसंघात सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा साठी तरसाव लागत असेल तर मग इतक्या वर्षे सत्ता भोगली त्यावेळी काय काम केले. असा सवाल उपस्थित करत हर्षदाताई काकडे यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. विधानसभेच्या इच्छुक उमेदवार व मा.जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे माणिकदौंडी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.
माणिकदौंडी येथे आज कार्यकर्त्याचा मोठा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्रीधर महाराज शिंदे होते. या कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, रामभाऊ साळवे, सरपंच मिठूभाऊ चितळे, सरपंच विकास राठोड, विष्णू कोठे, दिगंबर चितळे, सुरेशराव पवार, फकीर मोहम्मद पठाण, जलीलभाई पठाण, बाळासाहेब आंधळे, सुरेश चौधरी, फैयाज पठाण, अशोक ढाकणे, वैभव पुरनाळे, बिलालभाई पठाण, समीर आठरे, रज्जाकभाई शेख, अमोल शेळके, फकीर मोहम्मद पठाण, अकबर पठाण, मानसिंग सांगळे, लक्ष्मण राठोड, रोहित तोडकर, अण्णा फुंदे, सिराजभाई शेख, देवराव दारकुंडे, सुनील शेळके, रवींद्र नवगिरे, दिलीप मोहिते इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सौ.काकडे म्हणाल्या की, सध्या फक्त नारळ फोडणे कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालू आहे. मतदारसंघातील कोणत्याच गावात दर्जेदार विकास कामे नाहीत, रस्ते नाहीत, पिण्यास पाणी नाही मग यांनी कसला विकास केला ? मूलभूत गरजा पासून त्यांनी तालुका वंचित ठेवला आहे. सत्ता कशासाठी असते गोरगरिबांची सेवा व्रत तुम्ही सत्तेच्या माध्यमातून घ्यायचे असते. परंतु तुम्ही फक्त स्वतःचे, संस्था बगलबच्चे मोठे केले. हे साखरसम्राट एकच आहेत त्यांची आतुन मिलीभगत आहे. त्यांना फक्त मी सत्तेत नकोय त्यासाठी त्यांच्या गुप्त बैठका होतात. माझ्याकडे कोणताही मोठा पुढारी नाही लहान माणसं माझ्याकडे आहेत. माझी लहान लहान माणसं आता पेटून उठलेले आहेत. विकासाचा दृष्टिकोन नाही दूरदृष्टी नाही तर सर्वसामान्यांची मुलं अशीच बेरोजगार राहावीत अशी यांची मानसिकता आहे. माणिकदौंडीसह पाथर्डी तालुक्यातील सर्वांगीण विकासाचा अजंठा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. यावेळी आमदारकीची संधी द्या. माणिकदौंडी भागात विकासाचा डोंगर उभा करू. इतक्या दिवस तुम्ही यांनाच मत दिली आहेत तरी सर्व सामान्य जनतेला मूलभूत सुविधांसाठी तरसाव लागत आहे. एक वेळेस बदल करून पहा. आमच्या घराण्याला संघर्षाचा वारसा आहे. मतदारसंघात सर्व मुलभूत सुविधा देईल असेही सौ काकडे म्हणाल्या. तसेच यावेळी अमोल शेळके यांनी दोन लाख व सतिष आठरे यांनी दीड लाख रुपयांचा निधीचा धनादेश सौ काकडे यांना निवडणुकीसाठी निधी म्हणून दिला. यावेळी ॲड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, प्रस्थापित आमदार या तुम्हाला काहीही देऊ शकत नाहीत. त्यांनी २०१४ साली अचानक पक्षात प्रवेश नसताना माझ्या तिकिटावर दरोडा टाकला. या देणाऱ्यापैकी नाहीत या दरोडा टाकून लुबाडणाऱ्या आहेत. यांना नऊ गावांची योजना १३ गावांची झाली हेही माहीत नाही. संघर्ष आम्ही शेतकऱ्यांनी केला व आमदार पत्र हातात धरून फोटो काढून घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. आम्ही जो पाणी संघर्ष केला तो त्या १३ गावातील शेतकऱ्यांना माहित आहे. मग कसला खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करता ? मतदारांनो ही संधी आहे नाहीतर आमच्या सारखा संघर्षातून तयार झालेले घराणे परत तयार होणार नाही. निवडणूक आली की या साखर सम्राटांना सर्वसामान्यांची आठवण येते आता लोटांगण घालतील पाया पडतील निवडून आल्यावर हे सर्वसामान्यांना मात्र हाकलून लावतात. हे व यांचे चेले चपाटे अफवा पसरवतील आम्ही कुणाच्या एका दमडीलाही लाजिंदार नाहीत किंवा कोणत्या शब्दाला, पदाला, आमिषाला ही लाजिंदार नाही यांनी एका व्यासपीठावर यावे व जाहीर करावे यांनी अफवा पसरवल्या त्यातील एक जरी गोष्ट खरी असेल तर आपण म्हणाल ते आपण करू. परंतु जनता यांच्या आफवांना बळी पडली व आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येत आहे. असे ॲड काकडे म्हणाले. यावेळी अनिल महाराज मुंडे, रमेश महाराज राठोड, विनायक देशमुख, जगन्नाथ भापकर यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी केले सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले तर आभार जगन्नाथ बोडखे यांनी मानले
➡️ – हजारो कोटींचा विकास निधी आला परंतु टक्केवारीमुळे निकृष्ट व दर्जाहीन विकास कामे झाली. कोट्यावधी रुपये खर्च झालेले रस्ते चार सहा महिन्यात उखडले. साखर कारखानदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक व पिळवणूक केली जाते. इतर महाराष्ट्रातील कारखाने उसाला 3500 भाव देत असताना मात्र इथले कारखाने 2700 रुपये भाव देतात. सर्व सामान्यांचा लोक प्रतिनिधी होऊ नये यासाठी यांच्या गुप्त बैठका होतात. परंतु आम्हालाही संघर्षाचा वारसा आहे हे त्यांनी विसरू नये – ॲड. शिवाजी काकडे