आष्टी (प्रतिनिधी) दिवसेंदिवस दिवस पदवी – पदव्युत्तर शिक्षण घेऊन बेकारी वाढतच आहे. आय. टी. आय. संस्था सुरू करुन बेरोजगारीवर मात करण्यासाठी जून महिन्यापासून मतदारसंघात ५ ठिकाणी आय. टी.आय. सुरू करणार असल्याचे माजी आ. भीमराव धोंडे गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी झालेल्या सभेत सांगितले.
पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा सुरू आहे. ४ ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील बावी, सुरुडी, नागतळा, खडकवाडी,पांगरा, महिंदा, मोराळा, मेरडवाडी,माळेवाडी,वनवेवाडी
पाटसरा,हातोला,कापशी या गावांचा दौरा केला. ठिकठिकाणी तोफा व फटाके वाजवून माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. नागतळा येथील ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत केले.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले आपल्या संस्थेत सध्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी गोरगरिबांची ४० हजारांवर विद्यार्थी शिकत आहेत. बारावी व नंतर पदवीचे शिक्षण घेऊन सध्या नोकऱ्या कमी आहेत, त्यामुळे भविष्यात टेक्निकल शिक्षण महत्त्वाचे आहे. दहावी पास नंतर इतर शिकण्यापेक्षा एक – दोन वर्षांचे आय. टी. आय. कोर्स पुर्ण केल्यास विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळते त्यामुळे काही प्रमाणात का होईना बेरोजगारीवर मात करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे शंभरावर कोर्सेस आहेत असेही मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले.
हातोला येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास माजी आ. भीमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस
अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, साहेब हे उमेदवार निश्चित आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी लोकसभेच्या निकालाचा वचपा काढण्यासाठी तयारी करा. साहेबांनी मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे. हक्काचा माणूस म्हणून साहेबांना विधानसभेत पाठवा. वेगवेगळ्या ठिकाणी भाऊसाहेब लटपटे,माजी पं. स. सदस्य बाबासाहेब गर्जे, कुंडलिक आस्वर,सरपंच अभय गर्जे, सरपंच बाळासाहेब गर्जे,सरपंच संजय मिसाळ, सरपंच डॉ. नवनाथ गर्जे, कुंडलिक लटपटे, सुर्यभान कावळे, माजी सरपंच नारायण गर्जे, नवनाथ मिसाळ, सरपंच महेश अंगारखे, रामदास सोनवणे, भगवान गर्जे, विठ्ठल रोमण, कचरु दराडे, राजाभाऊ दगडखैर व इतरांची भाषणे झाली.
श्री. छगनराव तरटे,अभयराजे धोंडे,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख, युवा नेते विकी शेकडे, कुंडलिक आस्वर, योगिराज गर्जे, आबासाहेब गोल्हार, निवृत्ती गर्जे, रामभाऊ सारुक, उपसरपंच एकनाथ गर्जे,साहेबराव गर्जे,सरपंच केशव गर्जे, गहिनीनाथ साबळे, बबनराव सोनवणे, माऊली गर्जे , राजेंद्र गोरे, मच्छिंद्र गर्जे, दादासाहेब गर्जे, बाबासाहेब गर्जे, भगवान गर्जे, पोपट दहिफळे, मुरलीधर दहिफळे, आजिनाथ दहिफळे, बापुराव आव्हाड, सुर्यकांत गर्जे, मुरलीधर शेंडे, राजु जाधव, विष्णू शेंडे,अमोल शेंडे, सरपंच रभाजी गर्जे, सुखदेव शेंडे, अंबादास गर्जे, बापुराव गर्जे, आजिनाथ गर्जे, बाबासाहेब
फुलमाळी व इतर उपस्थित होते..