spot_img
spot_img

गोमाता – राज्यमाता या निर्णयाचे पाथर्डीत गोसेवकांकडुन पेढे वाटून स्वागत..

पाथर्डी (प्रतिनिधी) : – गाय ही हिंदू सनातन धर्मात व भारतीय संस्कृतीत पूजनीय आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा असून अशा पूजनीय असणाऱ्या गायीला आता महाराष्ट्रात राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे तमाम गोसेवक व गोरक्षकांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो असे गौरवोद्गार जेष्ठ गोसेवक सोमनाथ बंग यांनी काढले.
देशी गोमाता – राज्यमाता या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे पाथर्डी शहरासह तालुक्यात गोसेवक व गोरक्षण समितीच्या वतीने शहरभर पेढे वाटून जोरदार स्वागत करण्यात आले. गो सेवकांनी ५१ किलो पेढ्याचे संपूर्ण शहरभर वाटप करत शिंदे सरकारने अभिनंदन केले.
यावेळी गोसेवक मुकुंद गर्जे, बाळासाहेब गीते, नानासाहेब पालवे, आशुतोष शर्मा, सारंग मंत्री, महेंद्र परदेशी, रमेश बोरुडे, महेश आंतरकर, तेजस पटवा, किसन फतपुरे, बजरंग डमाळे, आशुतोष बोर्डे, गणेश भाबड, राहुल टेके, प्रथमेश नाकील, कुशल शर्मा, कार्तिक कराड, प्रवीण फुंदे, शंकर पालवे आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षण समिती, गोसेवा समिती, शिवसेना आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजेच देशी गायीला राजमाता म्हणून घोषित करण्यात आले. खरे तर वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत देशी गाईचे स्थान खूपच मोलाचे आहे. गायीच्या दुधाची उपयुक्तता मानवी आहारात अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आयुर्वेद चिकित्सा, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये शेण व मूत्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. हे लक्षात घेऊन आतापासून देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयानंतर शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे विविध हिंदूत्ववादी संघटनांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. या निर्णयामुळे गोमातेचा आशिर्वाद व गोपालक व गोरक्षकांचा ही आशिर्वाद या सरकारच्या मागे राहणार आहे. या निर्णयामुळे आता गोमातेचे संरक्षण होणार असुन भारताला पुन्हा वैभवाचे व आरोग्यदायी दिवस येतील असे यावेळी उपस्थित गोसेवकांनी सांगितले.

➡️- जैन धर्मीयांच्या वतीनेही शिंदे सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले व सरकारचे अभिनंदन करण्यात आले. जैन धर्म स्थानकात जैन साध्वी स्नेहाश्रीजी यांनी आपल्या प्रवचनातुन महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले त्यास उपस्थित सर्व जैन बांधवांनी एकमुखी अनुमोदन दिले. या अतिशय आनंददायी व चांगल्या निर्णयाचे परिणाम ही निर्णय घेणाऱ्यांना निश्चित चांगले मिळतील असा आशावाद व्यक्त केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!