spot_img
spot_img

भाजप नेते गोकुळ दौंड यांचा शुक्रवारी पाथर्डीत निर्धार मेळावा…

पाथर्डी (प्रतिनिधी):- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपमध्ये आगामी विधानसभेच्या उमेदवारी साठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मतदार संघातील पक्षातील सर्व इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागले आहेत. याच निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे इच्छुक उमेदवार ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड व माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी येत्या शुक्रवारी ( दि. ४ ऑक्टोबर) रोजी पाथर्डी येथील विजय लॉन्स या ठिकाणी समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यासाठी पाथर्डीसह शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काल नगर येथे पक्षश्रेष्ठी समोर झालेल्या पक्षांतर्गत राड्यामुळे या मेळाव्याची खमंग चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे.
मागील महिन्यात शेवगाव येथे पार पडलेल्या निर्धार मेळाव्यास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दौंड व मुंडे यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याने या मेळाव्यासाठी ही जोरदार तयारी करण्यात आली आहे.
भाजपच्या अधिकृत उमेदवारीसाठी गोकुळ दौंड व अरुण मुंडे इच्छुक असून त्या दृष्टीने पक्षांतर्गत चाचपणी सुरू असुन पक्षातील निष्ठावंत व भाजपचा मतदार असलेल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. या निमित्ताने गोकुळ दौंड व मुंडे यांनी मतदार संघातील अनेक गावांना भेटी दिल्या असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. प्रत्येक गाव वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते आहेत. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या गाठीभेटी ही घेतल्या आहेत. या मेळाव्यात दौंड मुंडे पक्षांतर्गत काय भुमिका घेणार याकडे ही तालुक्यातील राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात असून हा मेळावा पक्षांतर्गत दावेदारी साठी महत्वाचा ठरु शकतो. या विषयी बोलताना दौंड म्हणाले की, भाजप पक्ष हा काही कुणा एका व्यक्ती किंवा घराण्याचा पक्ष नाही. तालुक्यातील सर्व सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उभा केलेला हा पक्ष आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आम्ही सर्वसामान्य असलो, गरीब असलो तरी ही लढाई स्वाभिमानी व निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी लढलो. पक्षावर आमचाही हक्क आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवून पक्षातील जुन्या जाणत्या, निष्ठावंत जनतेच्या मनातील उमेदवार पक्षाने द्यावा अशी आमची मागणी आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!