आष्टी (प्रतिनिधी) शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी,तालुका आष्टी जिल्हा बीड या संस्थेस नवीन बीएस्सी नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी पाटोदा शिरूर मध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय केलेली आहे प्रत्येक वर्षी नवनवीन शिक्षणाची सोय करण्यात येत आहे या नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालयामुळे आष्टीच्या वैभवात आणखीनच भर पडलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत काम करण्याची सुवर्णसंधी यामुळे मिळणार आहे. आता ग्रामीण भागातील होतकरू गोरगरीब शेतकऱ्याच्या मुला मुलींना शहरांमध्ये जाऊन भरमसाठ फी व जास्त खर्च करण्याची गरज नाही तेच शिक्षण आष्टी मध्ये कमी खर्चात, कमी फीस मध्ये सर्व शिक्षणाची सोय, मा. आ. भीमराव धोंडे साहेबांनी आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुलात केलेली आहे. आनंद शैक्षणिक संकुल आष्टी येथे बीएससी ऍग्री महाविद्यालय,अन्नतंत्र महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज , फार्मसी कॉलेज (D.B.आणि M. फार्मसी) महेश आयुर्वेद महाविद्यालय,ANM .,GNM., कृषी तंत्र विद्यालय ,पशुसंवर्धन विद्यालय,. महेश पॅरामेडिकल (P. G.D.M.LT) कॉलेज. आणि आत्ता 2024 पासून बीएससी नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली आहे. शैक्षणिक संकुलामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृहाची देखील सोय केलेली आहे. या सर्व शैक्षणिक सुविधामुळे आष्टी पाटोदा शिरूर येथील सर्व शेतकरी,शेतमजूर, तसेच सर्व व्यापारी, हे मा,आ, भीमराव धोंडे व संस्थेचे सहसचिव डॉक्टर अजय दादा धोंडे यांचे अभिनंदन करत आहेत…बीएससी नर्सिंग साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सीईटी धारक विद्यार्थी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या या फोनवर संपर्क साधावा…९४२३४७१३९५,८१६९३१७२९३,८३८०८३०३०६,९४२१३३९६०४.