spot_img
spot_img

जनतेच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे – आ. बाळासाहेब आजबे

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबणार नाहीत येणाऱ्या कामांची तात्काळ सोडूवणूक करून ती मार्गी लावावीत ग्रामीण भागात ग्राउंड वर जाऊन कर्मचाऱ्यांनी काम करावे आपले कर्मचारी काय दिवे लावतात याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे जेणेकरून सामान्य जनतेला एका कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही अशा सूचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या .
आष्टी तहसील कार्यालयात सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी आष्टी तहसीलच्या तहसीलदार नालगोंडा पाटील गटविकास अधिकारी सानप साहेब यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेतकऱ्यांशी संबंधित विभागाच्या व इतर विभागाची सविस्तर माहिती घेत मार्गदर्शन केले यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले की कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फिल्ड वर जाऊन शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत याची पाहणी करणे गरजेचे आहे सध्या वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतामध्ये असून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्याच ठिकाणी कशा सोडवता येतील याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे अशा सूचना दिल्या तर तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी आपल्या दिलेल्या सजा वर हजर राहिले पाहिजे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे व येणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही कामा धंद्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच जलसंधारण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तलावांची जाऊन पाहणि करावी यापुढेही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे कोठेही धोका होणार नाही याची काळजी घ्यावी संजय गांधी निराधार योजनेतील आलेले सर्व अर्ज निकाली काढून आवश्यक असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी तहसीलदार यांना दिल्या तर पंचायत समिती व तहसील अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना साठी आलेले अर्ज तात्काळ मंजूर करून सिंचन विहिरी शेत तलाव यांचे मस्टर सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते मंजूर करून आणले आहेत ते सर्व पांदण रस्ते मार्गी लावण्यासाठी तहसील प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिल्या या बैठकीसाठी सर्व विभागातील अधिकारी त्याचबरोबर जेष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे युवा नेते महेश आजबे बाबासाहेब शेंडगे बाबासाहेब भिटे राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले राजेंद्र जरांगे सरपंच केशव आजबे रवींद्र कुलकर्णी यांच्या सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!