देऊळगाव घाट.(प्रतिनिधी)देऊळगाव घाट तालुका आष्टी, जिल्हा बीड, हे गाव गर्भागिरी पर्वताच्या पायथ्याला वसलेले एक छोटेसे गाव आहे. साधारण या गावाची लोकसंख्या तीन हजार एवढी आहे. देऊळगाव घाटच्या चारही बाजूने गर्भगिरी पर्वत असल्यामुळे, आणि इथल्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे, शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांची पहिली पसंती ही शेळीपालन व्यवसायला आहे. परंतु देऊळगाव घाट परिसरातील शेडाळा सावरगाव, कारखेल, या गावात शेळी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे.
मागील तीन महिन्यात ,चार शेतकऱ्यांच्या दहा शेळ्या चोरीला गेल्या असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण आहे. यामध्ये किसन मारुती ठोंबरे, व पोपट आत्माराम मगर ,यांची प्रत्येकी एक शेळी चोरीला गेलेली आहे. व काल दिनांक 20 जुलै रोजी, नामदेव सूर्यवंशी (देऊळगाव घाट) यांचे दोन बोकडे ,व दोन शेळ्या,व साखरबाई मस्के (शेडाळा ) यांचे एक बोकड व तीन शेळ्या रात्री चोरट्याने चोरून नेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
➡️ माझे दोन बोकडे आणि दोन शेळ्या चोरीला गेल्यामुळे, माझे जवळ जवळ 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.हे नुसकान कधीही न भरून येणारे आहे. कारण माझा सर्व शेळ्यावरच उदरनिर्वाह चालू असतो.
…शेतकरी..
.. नामदेव सूर्यवंशी.
.. देऊळगाव घाट..