मुंबई : नेत्रा न्युज नेटवर्क
भारतीय शिक्षण यंत्रणेमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षण व प्रशिक्षण देण्यामध्ये ज्या शाळांच्या संचालक प्रतिनिधींनी योगदान दिलेले आहे अशा भारतातील काही नामांकित शाळा,शिक्षण तज्ञ, शिक्षक ,संचालक यांना भारत सन्मान 2023 नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण उपक्रम व संघटनासाठी हा पुरस्कार स्वंयअर्थसाहय्यित मराठी व इंग्रजी शाळा संघटना संस्थापक अध्यक्ष संजयकुमार चव्हाण यांना वरळी मुंबई येथे ओएलएल तर्फे श्रेयन डागा व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
भारताच्या प्रतिकृतीची एक ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र मेंबरशिप कार्ड व रोख रक्कम असे या स्किल भारत सन्मान पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार अशोका पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना समर्पित करतो. हा सन्मान सर्व विद्यार्थ्यांमध्ये नवीन रोबोटिक, वैज्ञानिक दृष्टिकोन व विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी मला नक्की प्रेरणा देईल. असे याप्रसंगी सत्कार्याला उत्तर देत असताना अशोका पब्लिक स्कूल मंठाचे संचालक संजयकुमार चव्हाण यांनी दिले.
भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल करणारे अमूल्य असे कौशल्य शिक्षण विकसित करण्यासाठीच्या योगदानासाठी हा स्किल भारत पुरस्कार देण्यात आला.
संजय चव्हाण यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय खाजगी शाळा संघटनेचे (निसा)अध्यक्ष डॉ. कुलभूषण शर्मा, महाराष्ट्र राज्य स्कूल बस असोसिएशन चे अध्यक्ष अनिल गर्ग सह सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.