आष्टी (प्रतिनिधी)- आष्टी तालुक्यातील पाटण येथे लोकनेते महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची आष्टी तालुक्यात ओळख आहे,असे सोमिनाथ वणवे हे नगर येथे हमाली कामगार म्हणून काम करत आहे, आपल्या नेत्यावर जीवापाड प्रेम आहे हे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवली जात असतात ,यावर्षीही जिल्हा परिषद पाटण शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वाॅटर बाॅटल मोफत वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थींना स्वच्छ व चांगले पाणी पिण्यासाठी मिळावा याकरीता पाटण सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नामदार धनंजय मुंडे यांच्या समर्थक सोमीनाथ वनवे यांच्याकडून पाणी बाॅटलचे वाटत करण्यात आले आहे
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत पाटण सांगवी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब जगताप, लक्ष्मण वनवे, किशोर वनवे,पोपट वनवे, संदिप वनवे, ज्ञानदेव खंडागळे, बाळासाहेब वनवे,केशव वनवे, नितीन वनवे,सागर वनवे, मारुती वनवे,आदी मान्यवर, उपस्थित होते..