spot_img
spot_img

पंकजाताई मुंडे यांची विधानपरिषद आमदार पदी निवड देवळाली सह आष्टी तालुक्यात फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा

आष्टी (प्रतिनिधी )पंकजाताई मुंडे या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्याचे कळताच देवळाली सह आष्टी तालुक्यासह जिल्हाभरात फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते अखेर विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केले होते.
पंकजा मुंडे या कणखर नेत्या म्हणुन ओळखल्या जात असल्याने राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास भारतीय जनता पार्टीची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसू शकते अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

भाजपा उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण
आतापर्यंत हाती आलेलेल्या निकालानुसार, पंकजा मुंडे यांना २६ मते, योगेश टीळेकर यांना २६ मते, परिणय फुके यांना २६ मते, तर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ २३ मतांची आवश्यकता होती. या २३ मतांचा कोटा भाजपाच्या पाचही उमेदवारांनी पूर्ण केला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!