आष्टी (प्रतिनिधी)विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेतला असून त्यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील विविध रस्ते विकास कामासाठी 15 कोटी रुपये एवढ्या भरघोस निधीस मंजुरी मिळाली आहे यापूर्वी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून शिंपोरा ते खुंटेफळ उपसा सिंचन योजनेसाठी 150 कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालयासाठी 88 कोटी 34 लक्ष रुपये सुरडी व शेडाळा येथील आश्रम शाळेसाठी 30 कोटी रुपये कोल्हापुरी बंधारा व नदीवरील बॅरिकेज साठी 50 कोटी रुपये अशा विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रयत्न करून या अधिवेशनामध्ये मतदार संघातील विविध विकास कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे
आज अर्थसंकल्पीयअधिवेशनात पुरवण्या मागण्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्ते मार्गासाठी 15 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला असून या मंजुरी मध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे
1)अमरापूर -पाथर्डी -कडा -शिराळ मिरजगाव रामा 54 रस्ता मध्ये सुधारणा करणे 04 कोटी रुपये,
2)चिंचपूर इजडे- सुरुडी- दैठण -आष्टी ते रामा 55 रस्ता मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे 01 कोटी 50 लक्ष रुपये
3) जिल्हा सरहद्द ते लोणी -धानोरा -वृद्धेश्वर सुधारणा करणे 05कोटी रुपये .
4)डोंगरगण ते देवी निमगाव रस्ता मध्ये सुधारणा करणे 04 कोटी 50 लक्ष रुपये अशा एकूण 15 कोटी रुपये रस्ते विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरी बद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.