spot_img
spot_img

माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म मोफत भरणार

आष्टी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामुळे सर्वत्र महिलांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी होत आहे तसेच अनेक ठिकाणी आर्थिक पिळवणूक होत आहे परंतु माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावतीने आष्टी येथे सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मोफत भरले जाणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकरी व महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली आहे. यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील अशांना पंधराशे रुपये महिना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. तसेच काही ठिकाणी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात मोफत ऑनलाईन अर्ज भरले जाणार आहेत. महिलांनी सर्व कागदपत्र जमा करून आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या किनारा चौकातील संपर्क कार्यालयात जमा करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक दादा जगताप, ( 99219 61918 ), जफर शेख, हौसराव एकशिंगे, राहुल निकाळजे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या योजनेचा सर्व पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.

माजी आमदार भीमराव धोंडे साहेब संपर्क कार्यालय किनारा चौक आष्टी

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!