कडा(प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली येथे एसबीआयच्या शाखेत 69 व्या स्थापनादिनानिमित्त बँकेकडून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व मिठाई वाटप करण्यात आली यानिमित्ताने देवळालीच शाखेचे प्रबंधक दीपक भोसले म्हणाले की जसं एक झाड ऑक्सिजन सिलेंडर सारखं काम करतं तसं तुम्ही ग्राहक बँकेसाठी आहात.हिरवीगार वसुंधरे ने वनस्पती पशुपक्षी सुरक्षित आहेत म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे याच निमित्ताने कार्यक्रमाला उपप्रबंधक कैलास कुमार सर ,सौमित्र कुलकर्णी,सूर्यकांत वायभासे, पत्रकार अतुल जवणे आदी उपस्थित होते