spot_img
spot_img

विद्युत महामंडळाचा गलथान कारभार लोंबकळतअसलेल्या तारा जीव गेल्यावर बदलणार काय ?;विजय आण्णा गाढवे

धामणगाव (प्रतिनिधी) : आष्टी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाथर्डी रोड लगत विजय आण्णा गाढवे यांच्या पेट्रोल पंपा शेजारील एका शेतकऱ्याच्या शेतात अगदी रहदारीच्या मार्गावर म्हणले तरी वावगे ठरणार नाही. अश्या ठिकाणी लोंबकळत असलेल्या विद्युत तारा याकडे धामणगाव विभागीय महावितरण कार्यालय व कंपनीचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच सदरील वाकलेला विद्युत खांब व लोंबकळत असलेल्या तारा कधीही कोसळून पडतील याची शाश्वती देता येत नसल्याचे दिसत आहे .

सदरील विद्युत तारा अगदी अर्ध्या फुटाच्या अंतरावर वाकलेल्या आहेत. पाथर्डी रोडवर विजय अण्णा गाढवे यांच्या पेट्रोल पंपाजवळ रस्त्यालगत च असलेल्या शेतात विद्युत पुरवठा करणाऱ्या ह्या विद्युत तारा मागील दहा महिन्यांपासून लोंबकळत आहेत .त्यामुळे ह्या तारा कधीही तुटुन मोठा आपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .

महावितरण कंपनीच्या पोल वरुन ही जाणारी लाईन आहे .जर ह्या विद्युत पुरवठा करणार्या लोंबकळलेल्या तारा तुटून मोठा अनर्थ होऊ नये. याविषयी अनेकदा राष्ट्रवादीचे युवा नेते विजय यांना गाढवे यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार कल्पना दिली आहे. परंतु याकडे हि कर्मचारी वेळ काढू पणा करत आहेत.परंतु याची महावितरण कंपनीला गांभीर्य दखल घ्यावी लागेल.नसता एखाद्याचा जीव गेल्यावर संबधित खात्याला जाग येईल का ?असा संतप्त सवाल विजय आण्णा गाढवे यांनी केला आहे.

ह्या लोंबकळलेल्या विद्युत तारा शेतातून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा अनर्थ होऊ शकतो.असे अनेक विद्युत खांब काही सडलेले व वाकलेले मोडकळीस आले आहेत. अथवा ते केव्हाही कोसळू शकतात अशी अवस्था निर्माण झाली आहे. तसेच आशा विद्युत खांबांवर कर्मचारी वर्गाना ही काम करणे धोकादायक ठरत आहे .

अश्या परिस्थितीचा महाराष्ट्र विद्युत महामंडळ वि कंपनीने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर लोंबकळत असलेल्या तारा बदलण्यात याव्यात. शेतकऱ्याच्या जिवितास धोका झाल्यास सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गाढवे यांनी दिला आहे.

➡️ महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवाला धोका झाला तर महावितरण कंपनीचे कर्मचारी जबाबदार राहतील….
विजय आण्णा गाढवे (धामणगाव गटाचे राष्ट्रवादीचे नेते)

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!