पाथर्डी (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मदत करणे व सामाजिक भान ठेवून सर्व स्तरातील नागरिकांना मदत करत असताना विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानुन त्यांना उपयोगी शालेय साहित्य वाटप करणे हे एका संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्षण आहे. आजचे बाल विद्यार्थी हे उद्याचे देशाचे उज्वल भविष्य आहेत.
आपला वाढदिवस साजरा करताना उपेक्षित व गरजवंताना आपल्या आनंदात सामावुन घेणं हे खऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गुण आहे असे प्रतिपादन शिक्षक अशोक खोले यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त इंदिरानगर येथील प्राथमिक शाळेत मुलांना शालेय साहित्य, छत्री व खाऊ वाटप कार्यक्रम प्रसंगी खोले बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते इजाज भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात इजाजभाई मित्र मंडळ व मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, गरजवंताना साहित्य वाटप आदी उपक्रम पार पडले.
यावेळी दत्ता डिगे,शैलेश उगार, दिपक दिनकर, शिरसाट मेजर, अशोक खोले, अशोक मोहेकर, सचिन खारगे, महेंद्र दिनकर, दिपक भारस्कर, समर्थ कोकणे, कानिफ विधाते, अमोल भैरट,आनंद गोरे, नंदु कुरकुटे, मानु दिनकर, सोहेल पठाण, मोसिन पठाण, महेश अंतरकर, सोनु तरटे, सागर तरटे, नंदु खोले, संदीप काळोखे, समीर शेख, कपील वेलदोडे, सचिन यादव व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन खारगे यांनी बोलताना शेख यांनी वर्षभर राबवित असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत सामाजिक सलोखा जपत गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्सव साजरा करणे, पायी येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप, विविध महापुरुष जयंती, पुण्यतिथी साजरी करणे, बचतगट स्थापना, करोना काळातील मदत आदी उपक्रमांचा व या भागातील नागरिकांना वेळोवेळी केलेल्या मदतीच्या उपक्रमांचा उल्लेख करत शेख यांनी सामाजिक प्रश्नाची केलेली सोडवणूक, या भागातील विविध समस्या व केलेल्या आंदोलनांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता डिगे यांनी केले तर आभार शैलेश उगार यांनी मानले.