spot_img
spot_img

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व निमा संघटनेचा बिनविरोध विजय!

पाथर्डी प्रतिनिधी :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व निमा विद्यार्थी संघटनेने अभूतपूर्व बिनविरोध विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सर्व ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात उमेदवारांनी आपले यश संपादन केले आणि संपूर्ण विद्यापीठात एकजुटीचा संदेश दिला आहे. या विजयामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्रियाकलापांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल अशी अपेक्षा आहे.

अभाविपच्या या विजयाबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला. यावेळी विद्यापीठ अध्यक्ष धनंजय मडके म्हणाले, “हा विजय आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत राहू आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहू. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या सिनेट वर श्रीतेज हिर्गुडे, सदाकांत राठोड, ऋषिकेश इप्पर, उपाध्यक्ष चैतन्य मेश्राम, अभिषेक धामणे, सेक्रेटरी नेहा दुर्गाडे जॉइंट सेक्रेटरी दत्तात्रय क्षीरसागर, स्नेहा इप्पर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अभाविप चे कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल, जिज्ञासा राष्ट्रीय सहसंयोजक रोहन मुक्के, नाशिक महानगर मंत्री ओम माळुंजकर निमा चे डॉ. सागर कारंडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!