spot_img
spot_img

हत्राळ सैदापुर येथील गोळीबाराच्या घटनेने तालुक्यात खळबळ.. कौटुंबिक वादातून कुटुंबावर सशस्त्र हल्ला..


पाथर्डी (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हत्राळ सैदापुर येथील केदार वस्तीवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून एकावर गोळी झाडण्यात आली. गोळीबारात माणिक सुखदेव केदार ही जखमी झाले असून शरीरात गोळी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस सूत्राकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील सुभाष विष्णू बडे याचे अकोला येथील मुलीशी लग्न झाले होते आठ वर्षानंतर पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता त्यानंतर घटस्फोटीत महिलेने हत्राळ येथील युवकाशी विवाह केला होता त्याच रागातून सुभाष बडे यांनी बुधवारी सायंकाळी हत्राळ येथील केदार वस्तीवर जाऊन केदार कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला. पिस्टल मधून झाडलेल्या गोळीतून माणिक केदार यांच्या छातीच्या खालच्या भागांमध्ये गोळी लागली असून त्यांना पाथर्डी चे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथे हलवण्यात आले आहे. हत्राळ येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुभाष बडे याला जमावाने मारहाण केली त्याच्या डोक्यामध्ये मार लागला आहे. जमावाने संशयित आरोपी सुभाष बडे याला बांधून ठेवले होते. घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर हे पोलीस कर्मचारी संदीप बडे व इतर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेथे ग्रामस्थांनी बांधून ठेवलेल्या सुभाष बडे याला ताब्यात घेण्यात आले तर घटनास्थळावरून एक पिस्टल आणि कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. माणिक केदार यांना नगरला हलवल्यानंतर सुभाष बडे याला देखील पाथर्डीचे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नगर येथे हलविले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून तालुका गोळीबाराच्या घटनेने हादरून गेला आहे.

➡️. कौटुंबिक वादातून झालेला हा हल्ला भयानक होता. घटना स्थळावरून पिस्टल व कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हल्ल्याचे कारण फिर्याद दाखल झाल्यानंतरच उलगडणार आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जावून जखमीला उपचारासाठी पाठवुन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!