बीड (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली येथे श्री चैतन्य स्वामी मंदिरासमोर देवळाली व परिसरातील सर्व महिला बचत गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आयसीआयसीआय बँकेकडून महिला बचत गटांना कर्ज वाटप संबंधी मार्गदर्शन करण्यात आले दीड लाख ते तीन लाखापर्यंत ७ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा महिला बचत गटांना करण्यात येणार आहे ज्या महिला बचत गटांना कर्ज घ्यावयाचे आहे त्या गटातील महिलांनी आवश्यक कागदपत्राचे पूर्तता करणे अनिवार्य राहील बचत गटाची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मात्र विविध व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी या गटांना योग्य मार्गदर्शनाची व दिशा देण्याची खऱ्या अर्थाने आजच्या घडीला गरज असल्याचे मत आयसीआयसीआय बँकेचे एस एम नारायण बंडे व हबीब ढोणे यांनी व्यक्त केले.
बचत ही महिलांच्या रक्तातच असल्याने ती अद्याप महिलांना ओळखता आली नाही बाजारात गेलेली स्त्री आठवड्याचा संपूर्ण बाजार करून थोडे पैसे नकळत कुटुंबासाठी शिल्लक टाकत असते हेच पैसे भविष्यात संसारात काही अडीअडचणी आल्यास त्या सोडविण्यास स्वतःहून खर्च करतात बचत गटाचा प्रचार आज बघता बघता देशभर वाढताना दिसून येत आहे यासाठी सर्व वर्गातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन तालुका व्यवस्थापक मंगल हजारे यांनी व्यक्त केले.
महिला वर्गाला स्वतःचा घर संसार आणि शेतीची कामे सांभाळून फावल्या वेळेत व्यवसाय करण्यास सवलत आहे मात्र कोणता व्यवसाय करावा म्हणजे तो चांगल्या प्रकारे चालेल याचे मार्गदर्शन करण्याचा दुवा त्यांच्या जवळ नाही त्यामुळे महिला गडबडून जातात बँकेमधून कर्जाची रक्कम देणाऱ्या महिला वर्गाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे बचत गटाच्या माध्यमातून शिवण क्लासचे प्रशिक्षण पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम तसेच ग्राम स्वच्छता अभियान तळागाळातील शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिर या मोहिमा राबवल्या जात आहेत समाजातील महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न बचत गटाच्या माध्यमातून सुरू आहे या महिला वर्गाची सकारात्मक जोड मिळायला हवी असे प्रतिपादन देवळालीच्या सीआरपी अनिता तांदळे यांनी व्यक्त केले
दुग्ध व्यवसाय मसाला, सांडगे, पापड, शेवया, अगरबत्ती,टेलरिंग, बेकरी अशा अनेक व्यवसायातून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात सदर खात्यांनी अशा उद्योगातून महिला रोज नवनवीन पदार्थ बनवायला लागल्या आणि असे पदार्थ दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला गरजेचे आहेत मात्र ग्रामीण महिलांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शन आर्थिक मदत आणि यंत्रसामग्रीची अशा सर्व गोष्टींची जुळवणूक करून दिली तर ग्रामीण भागातील महिला निश्चित सर्व क्षेत्रात पुढे येण्यास मदत होईल यासाठी शासनाने व इतर उद्योगधंदे व्यवसाय करणार्या उद्योगपतींनी महिलांना मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ मिळवून द्यावे असे प्रतिपादन जीवन ज्योती ग्राम संघाच्या लिपिक प्रियांका टकले यांनी व्यक्त केले.
देवळाली ग्रामपंचायत कडून देवळाली व परिसरातील सर्व महिला बचत गटांना जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन सरपंच अरुणाताई पोपट शेकडे त्यांनी दिले.या बैठकीस देवळाली गावच्या सरपंच अरुणाताई पोपट शेकडे उपसरपंच बापू पवार, पत्रकार अतुल जवणे,शरद खाडे, रविंद्र कुलकर्णी जीवन ज्योती ग्राम संघाचे अध्यक्षा मिराताई डोके सचिव मनीषा पाठक कोषाध्यक्ष अनिता हिंगणे लिपिक प्रियांका टकले सीआरपी अनिता तांदळे सह देवळाली व परिसरातील सर्व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या