आष्टी (प्रतिनिधि)-आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण व धामणगाव आणि तालुक्यामध्ये बकरीईद नमाज पठण करून मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली.
आष्टी,कडा,धामणगाव, केरुळ, दौलवडगाव सराटे वडगाव, या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मुस्लिम बांधवांनी गळा भेट देत ईद साजरी केली. नमाज पठण केल्यावर यावर्षी चांगला पाऊस होवो, भरमसाठ पीक येऊ दे, बळीराजा खुश होवो , शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ दे अशी दुवा मागीतली यावेळी अंभोरा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय साळवे साहेब, सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकार समीर शेख, उपसरपंच डॉ.अकील सय्यद, इस्माईल शेख, साजिद पटेल, शाबुद्दीन सर, दादामिया पठाण, पप्पू भाई, अजिम सय्यद, आलिम शेख, फारुख शेख, बादशहा शेख,रफिक पठाण, निसार भाई,सद्दाम शेख, आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..