बीड (प्रतिनिधी) शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावातील एका पस्तीस वर्षीय तरूणाने लोकसभेच्या निवडणूकितील पंकजाताई मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने नैराशेपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली .
याबाबत सविस्तर माहिती अशी की मा.पालकमंत्री पंकजाताई मुंडे ह्या लोकसभेच्या उमेदवार होत्या मात्र त्यांचा अल्पमतानी पराभव झाला , या पराभवातून आलेल्या नैराशेपोटी गणेश उर्फ (हरिभाऊ ) भाऊसाहेब बडे या तरूणाने रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिंचवन नावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .
घटनास्थळी स.पो.नि भाऊसाहेब शिरसाट यांनी जाऊन पंचनामा केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला .आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास स.पो.नी यांचे मागणीखाली पो उप निरीक्षक भाऊसाहेब शिरसाट हे करत आहेत .
मयत गणेश बडेच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मुली एक लहान भाऊ असा परिवार आहे .पंकजाताई मुंडे ,आ.सुरेश धस यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून कुटूंबियाचे सांत्वन केले . अशा प्रकारे खचुन जावून आत्महत्तेसारखा मार्ग कुणीही धरू नका असे आवाहन त्यांनी केले.या घटनेमुळे संपुर्ण वारणी गावावर शोककळा पसरली आहे .