spot_img
spot_img

शिवछत्रपती पतसंस्थेने सामाजिक कार्य करीत भविष्यात शतकमहोत्सव साजरा करावा :- माजी आमदार भीमराव धोंडे

देवळाली ( वार्ताहर):- गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करीत व गरजुंना कर्ज वाटप करुन कडा येथील शिवछत्रपती नागरी सह. पतसंस्थेने रौप्यमहोत्सव सोहळा साजरा केला आहे. यापुढेही अशाच प्रकारे चांगले काम करुन शतकमहोत्सव साजरे करावा असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा येथे केले आहे.
कडा येथील शिवछत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून माजी आमदार भीमराव धोंडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर, मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. बबन महाराज बहिरवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच युवराज पाटील, भारतीय जनता पार्टी किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव औटे व इतर उपस्थित होते.
प्रारंभी कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुखांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर वाजत गाजत पतसंस्थेकडे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर व इतर मान्यवरा़च्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, पतसंस्थेने गरजु लोकांना कर्ज वाटप करीत त्यांना आधार देण्याचे काम केले आहे यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक कार्य सुरू ठेवावे. माणसाची वयोमर्यादा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रत्येकाने नियमित व्यायाम करीत, निर्व्यसनी राहुन,सकस आहार घेऊन वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. राज्यशासनाने प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर येथे सर्वात जास्त भाविक बीड जिल्ह्यातील असतात, शेकडो दिंड्या असतात तरी दिंडी चालकांनी २० रुपये मिळविण्यासाठी कोठे नोंद करायची याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी. माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी सांगितले की, सहकार क्षेत्र म्हणजे खुप महत्वाचे आहे. या क्षेत्रात पारदर्शक कारभार चालवला तरच टिकून राहता येते. ग्राहकांच्या विश्र्वासामुळे हि पतसंस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. भविष्यात या पतसंस्थेची अशाच प्रकारे प्रगती होऊन वटवृक्षात रुपांतर व्हावे. याप्रसंगी ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी सांगितले की, संस्थेचे कार्य चांगले आहे . कडा परिसरातील गोरगरिबांना कर्जाच्या रुपाने आर्थिक सहकार्य केले आहे . ग्राहकांच्या विश्वासा मुळेच रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. सुवर्ण महोत्सवही अशाच प्रकारे साजरा होवो. प्रास्ताविक करताना शिवछत्रपती नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. शाम सांगळे यांनी सांगितले की, गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी या पतसंस्थेची स्थापना झालेली आहे. दुष्काळी भागातील अनेकांना कर्ज वाटप करीत उभारी देण्याचे काम पतसंस्थेने केले. ४४०३ ग्राहक असुन १३ कोटी पेक्षा जास्त ठेवी आहे. पतसंस्था दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. पंचवीस वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सेवा हेच ध्येय म्हणून आम्ही काम करीत आहेत. कार्यक्रमास माजी सरपंच संपत सांगळे, सुनिल देशमुख, बबलू तांबोळी, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, गोरख कर्डिले, चेअरमन दादासाहेब हजारे, ह. भ. प. आमटे महाराज, ह. भ. प. तावरे महाराज, ह.भ.प. कर्डीले महाराज माजी उपसरपंच राजु कर्डीले, बाळासाहेब वाघुले, चेअरमन नागेश कर्डीले, भाजपाचे जिल्हा चिटणीस शंकर देशमुख, माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे, गोकुळ कर्डिले, डॉ. गांजुरे, संतोष ओव्हाळ, रोहीदास सांगळे, पप्पु भंडारी, प्रताप परदेशी, डॉ‌. खिलारे, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, उपप्राचार्य डॉ बापु खैरे, राजेंद्र चौधरी, संतोष भंडारी, लोखंडे, राष्ट्रीय काँग्रेसचे रवि पाटील, डॉ. उद्धव सोनवणे, दत्ता होळकर, प्रा. बाळासाहेब धोंडे,राजु शिंदे , प्रा. मुश्ताक पानसरे, राजु भोजने,माजी सरपंच प्रा. राम बोडखे, बजरंग कर्डिले व इतर कडा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विनोद ढोबळे यांनी केले. उपप्राचार्य डॉ भास्कर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!