spot_img
spot_img

शेतकऱ्यांनी नवीन सूचनेप्रमाणे पिक विमा भरावा नावात बदल झाला असेल तर दुरुस्ती करावी.

आष्टी (प्रतिनिधी)दरवर्षी शेतकरी पिक विमा भरतात पिक विमा भरतांनी काही शिल्लक चुका होतात त्यामुळे विमा मिळण्यास अडचणी येतात यासाठी शेतकऱ्यांनी 2024 साठी ज्या नवीन सूचना आल्या आहेत त्या अनुषंगाने विमा भरावा असे आवाहन सीएससी केंद्र चालकाकडून करण्यात येत आहे 2024 साठी खरीप पिकांचा विमा भरण्यासाठी काही नवीन नियम जारी करण्यात आले आहेत सदर नियमांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेचे पासबुक व सातबारा वर समान नावे नाहीत या तिन्ही मध्ये थोडासाही फरक आला तर पिक विमा मिळण्यास अडथळा निर्माण होतो काहींच्या सातबारावर आडनाव किंवा नावात इतर कोणताही बदल झालेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेचे बँकेचे पासबुक व सात बारा वर बदल करावा व समान नावे करून घ्यावी तसेच आधार कार्ड बँकेचे पासबुक व सातबारा वर स्वतःच्या किंवा वडिलांच्या किंवा आडनावामध्ये असे थोडेफार बदल झालेले असल्यास अशा शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याच्या अगोदर आपल्या नावात दुरुस्ती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विमा मध्ये फॉर्म अप्रूवल होणार आहेत अन्यथा विमा भरलेला फॉर्म बाद होणार आहे एकदा का विमा भरला तर विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा विमा चा फॉर्म भरणारे प्रतिनिधी काही करू शकणार नाही नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सर्व समान असेल तरच विमा मिळणार आहे अन्यथा शेतकऱ्याने भरलेले फॉर्म डिलीट होणार आहेत त्यानंतर कोणतेही सीएससी केंद्र चालक याची जबाबदारी घेणार नाहीत तरी शेतकऱ्यांनी नवीन सूचनेप्रमाणे आधार कार्ड बँकेचे पासबुक सातबारा वर एकसमान नाव करून घ्यावे त्यानंतरच पिक विमा चा फॉर्म भरावा

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!