आष्टी(प्रतिनिधी)प्रज्ञाचक्षु मुकूंद काका जाटदेवळेकर(गोभक्त)यांनी श्री क्षेत्र दत्तधाम नाशिक श्री दत्तदास महाराज अतिशय जागृत ठिकाण दत्तप्रभूंचे मंदिर येथे १६महिने रोज गायत्री मंत्राचे पुरश्र्चरण म्हणजे २४लाख जप १५ तास अनेक महात्म्यांच्या सान्निध्यात साधना पूर्ण केली.शेवटी महाराष्ट्रातील दिग्गज किर्तनकार महात्म्यांच्या उपस्थितीत सांगता महोत्सव पार पडला.प्रज्ञाचक्षु ह.भ.प.मुकूंद काका आपली साधना करून परतल्यावर देवळाली ग्रामस्थांनी
चैतन्य गोशाळा ते चैतन्य स्वामी मंदिरापर्यंत टाळ मृदंग,डिजे, ढोल ताशांच्या गजरात हरिनामाचा जप करत भव्य दिव्य अशी रथातुन मिरवणूक काढली
चैतन्य स्वामी मंदिराजवळ प्रज्ञाचक्षु ह.भ.प.मुकूंद महाराज जाटदेवळेकर यांचा देवळाली ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर काकांनी आपल्या सुमधुर वाणीतून प्रवचन केले.या सर्व सोहळ्यामध्ये देवळाली सह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.