spot_img
spot_img

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडा आ. बाळासाहेब आजबे यांची मागणी

आष्टी (प्रतिनिधी)- आष्टी मतदार संघात सद्या दुष्काळी परिस्थिती असुन पाणी सर्वच मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडले तर काही अंशी पाणी टंचाई दुर होईल. त्यासाठी कुकडी प्रकल्पामधुन सिना-मेहकरी योजने अंतर्गत मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडणे अशी मागणी आ. बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.

आ. बाळासाहेब आजबे यांनी जिल्हाधिकारी बीड आणि मा. कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क 2 श्रीगोंदा जि अ.नगर यांना दिलेल्या पञात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील मेहकरी म.प्र.ता आष्टी या प्रकल्पामध्ये सद्यास्थितीत एकूण पाणीसाठा 0.180 द.ल.घ.मी (0.01%) एवढाच उपलब्ध आहे. सध्या सदरील प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये जलाशय उपस्यासह मोठ्या प्रमाणात उभे पिके आहेत त्यास पाण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रामध्ये टाकळी भामिया, शिरापुर पुडी, पिंपळगावदाणी या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असुन धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने ग्रा.प. योजनेला पाणी उपलब्ध होणेसाठी अडचणी निर्माण होत आहेत. तरी भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता सिना- मेहकरी योजने अंतर्गत कुक्कडी प्रकल्यातुन मेहकरी मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे.

➡️ लवकरच पाणी येईल ⬅️

आपण कुकडी प्रकल्पामधुन सिना-मेहकरी योजने अंतर्गत मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडणे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने लवकरच मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडले जाईल असे सकारात्मक उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे.

● आ. बाळासाहेब आजबे, आष्टी विधानसभा मतदारसंघ

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!