2011 च्या वर्ल्ड कपला 12 वर्षे झाल्यानंतर निवड समितीचे माजी सदस्य राजा व्यंकट यांनी खुलासा केला आहे. कोणामुळे रोहित शर्माचा पत्ता कट झाला होता हे त्यांनी सांगितलंय.कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 2011 चा वर्ल्ड कप विजेता संघ निवडला होता. याच समितीचे सदस्य असलेल्या राजा व्यंकट यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. एमएस धोनीमुळे रोहित शर्माला तेव्हा संघात निवडण्यात आले नव्हते असा दावा राजा व्यंकट यांनी केला.
धोनीला वर्ल्ड कप संघात पीयूष चावलाला घ्यायचं होतं असं त्यांनी म्हटलं.Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये विराटचा बदला घेण्यासाठी पाकचा वेगवान गोलंदाज सज्ज, लंकेत केला डंकारेव्ह स्पोर्ट्सशी बोलताना राजा यांनी सांगितलं की, निवड समितीच्या पॅनेलने सर्वानुमते रोहितची संघात निवड केली होती. पण नंतर हा निर्णय बदलण्यात आला. जेव्हा आम्ही वर्ल्ड कपसाठी संघ निवड करत होतो तेव्हा रोहित शर्मा आमच्या प्लॅनमध्ये होता.मी आणि यशपाल शर्मा भारतीय संघासोबत तेव्हा आफ्रिका दौऱ्यावर होतो. इतर तीन निवड समिती सदस्य श्रीकांत, सुरेंद्र भावे, नरेंद्र हिरवानी चेन्नईत होते.
जेव्हा आम्ही संघ निवडत होतो तेव्हा एक ते 14 नंबरपर्यंत खेळाडू प्रत्येकाला मान्य होता. पण 15 व्या खेळाडूसाठी रोहितचे नाव सुचवले तेव्हा प्रशिक्षक गॅरी कर्स्टनसुद्धा तयार झाले. पण धोनीला संघात पीयूष चावलाला घ्यायचे होते. पुन्हा गॅरी कर्स्टनही यासाठी तयार झाले आणि रोहितच्या जागी पीयूष चावलाची निवड झाली.