राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांच्यानंतर आजपर्यंत एकही भारतीय अंतराळात गेला नाही. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स याही अंतराळात गेल्या पण त्या भारतीय वंशाच्या आहेत, भारतीय नागरिक नाही.
पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा
विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हिएत इंटरकोसमॉस या अंतराळ मोहिमेचा भाग होते. 3 एप्रिल 1984 रोजी राकेश शर्मा यांची अंतराळ प्रवासासाठी निवड झाली. अंतराळात जाण्याची संधी मिळालेले ते पहिले भारतीय नागरिक होते.
अंतराळवीर राकेश शर्मा सध्या काय करतात?
आजही जेव्हा एखादी अंतराळ मोहीम राबवली जाते, तेव्हा राकेश शर्मा यांची चर्चा होते. राकेश शर्मा यांचे जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतात. पहिले भारतीय अंतराळवीर सध्या आहेत कुठे ते काय करतात आणि त्यांच्या आयुष्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
राकेश शर्मा यांचा परिचय
राकेश शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पंजाबमधील पटियाला येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी हैदराबादच्या जॉर्ज ग्रामर स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर निजाम कॉलेज हैदराबादमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी 1966 मध्ये नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये एअर फोर्स प्लेब म्हणून नोकरीला सुरुवात केली आणि 1970 मध्ये IAF पायलट बनले. पायलट म्हणून काम केल्यानंतर, 1992 मध्ये त्यांनी बंगळुरू एचएएलमध्ये मुख्य चाचणी पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 2001 मध्ये सेवानिवृत्ती घेतली.
राकेश शर्मा आता कुठे आहेत?
राकेश शर्मा निवृत्तीनंतर ते साधे जीवन जगू लागले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राकेश शर्मा साधं जीवन जगणं पसंत करतात. ते त्यांच्या पत्नीसोबत गावी निवांत आयुष्य जगत आहे. राकेश शर्मा पत्नी मधुसोबत कुन्नूर, तामिळनाडू येथे स्थायिक झाले आहेत. ते मीडिया आणि लाइम लाईटपासून दूर राहणे पसंत करतात. पण, देश सेवेसाठी तत्पर असतात. ते इस्रोच्या गगनयानसाठीच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते.