विहामांडवा (प्रतिनिधी)विहामांडवा येथून शेख मुसा इसाक व त्यांची पत्नी रशिदाबी मुसा शेख हे दोन भाविक मक्का मदीना येथे उमराह करण्यासाठी मुंबई येथून रवाना झाले. यावेळी गावातील त्यांच्या नातलगांनी व मित्र परिवारांनी फुलांचे हार व पुष्पगुच्छ देऊन तीर्थयात्रेसाठी रवाना करण्यात आले. प्रामुख्याने यामध्ये हे उल्लेखनीय आहे की ही तीर्थयात्रा मक्का, मदीना म्हणजे सौदी अरेबिया येथे वर्षातून एकदा मुस्लिमां कडून केली जाते कारण हा इस्लामच्या पाच पाया मधील एक महत्त्वाचा भाग आहे. इस्लामिक ग्रंथांनुसार, उमराह म्हणजे मक्का मधील हरम शरीफला भेट देणे, जे वर्षाच्या कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. या प्रवासात मुस्लिम समाजातील मक्का मदिना येथे पोहोचलेले व्यक्ती काबाभोवती प्रदक्षिणा घालतात म्हणजेच तवाफ करतात. ज्याचा तवाफ पूर्ण झाला त्याचा उमरा पूर्ण झाला असे मानले जाते.