spot_img
spot_img

आष्टी तालुक्यात शिवजयंतीचा जल्लोष,अष्टदिशा दणाणल्या शिवघोषाने भगवमय वातावरण देवळाली मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

आष्टी (प्रतिनिधी):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आष्टी तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.घराघरात गावागावात ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा कणखर घोषणांनी अष्टदिशा दुमदुमत होत्या.तालुक्यातील देवळाली, कडा, धानोरा, धामणगांव,घाटा पिंपरी,पांढरी सह हाजीपूर, वाळुंज, चिखली,ब्रम्हगांव कासेवाडी आंबेवाडी,मातकुळी,तवलवाडी,दैठण,मंगरूळ,सह गावागावातील शिवभक्तांची मोटारसायकल रॅली भव्य दिव्य अशी लक्षवेधक ठरली सकाळी गावागावातील चौकांमध्ये महाराजांना अभिवादन करण्यात आले घराघरात गावागावात शिवजयंती मोठ्या उत्साहात राजांना विविध कार्यक्रमांने अभिवादन करण्यात आले शिवभक्तांच्या अलोट गर्दी त गावागावातील मिरवणूका हातात भगवे ध्वज,भगवे फेटे असलेल्या भव्य दिव्य रॅली जळगांव कडा कारखाना येथे महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या सगळेच वातावरण भगवेमय झाले होते.आष्टी शहरातून महिलांची निघालेली भव्य मोटारसायकल रॅली लक्षवेधी ठरली
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आष्टी तालुक्यात अभुतपुर्व जल्लोष उत्साहात साजरी झाली भगवे झेंडे,आणि भगव्या पताकांनी शहर तालुका सजवला होता.शिवरायांच्या गितांचा आवाज अष्टदिशात घुमत होता प्रचंड जोषात अभूतपूर्व मिरवणूका निघाल्या तालुक्यात प्रमुख ठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. चौकाचौकामध्ये विविध सामाजिक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते.आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली,पांढरी येथे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली, देवळाली,मातकुळी, वाळुंज,करंजी, धानोरा,कडा, किन्ही, चिखली, धामणगांव, जळगांव,बेलगांव, तालुक्यातील गावागावात शिवाजी महाराजांना सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान,महापंगत विविध कार्यक्रमाने अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींच्या रांगा लागल्याचे दिसून आले. जळगाव येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रॅली व‌ शिवप्रेमी मोठ्या संख्येने दिवसभर दाखल होत अभिवादन करून नतमस्तक होत होते.हातात शिव ध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता आणि फेटे बांधलेल्या युवकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मिरवणुकीमध्ये युवकांनी भगवे झेंडे, भगवे फेटे असे सगळेच वातावरण भगवेमय झाले होते. विविध सामाजिक, राजकीय संघटनांनीही महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
➡️ रयतेचा राजा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. शिव जयंतीनिमित्त आ.सुरेश‌ धस, आ.बाळासाहेब आजबे,मा.आ.साहेबराव दरेकर,मा.आ.भिमरावजी धोंडे, सतिश शिंदे, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,युवा नेते अजय धोंडे, यांनी आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व जळगांव कारखाना येथे शिवरायांना अभिवादन करुन शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!