spot_img
spot_img

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची विधानसभेची जोरदार तयारी…

पाथर्डी (प्रतिनिधी) :- माणिकदोंडी सारख्या दुर्गम परिसरात रस्ते, वीज, पाण्याचे अनेक प्रश्न चंद्रशेखर घुले आमदार झाल्यानंतर त्यांनी मार्गी लावले. मात्र मागील दहा वर्षांमध्ये कुठलीही ठोस विकास कामे या परिसरात झालेली नाहीत. यामुळे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा चंद्रशेखर भाऊंना आमदार करावे लागेल असे आवाहन करत युवा नेते डाँ.क्षितिज घुले यांनी आ.मोनिका राजळे यांच्यावर नामोल्लेख टाळत टीका केली.
माणिकदौंडी परिसरातील आल्हनवाडी, घुमटवाडी, वाघदरा व महालदरा तांडा येथे शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.घुले यांनी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली व लमाण समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब ताठे, चांद मणियार, घुमटवाडीचे सरपंच विजय चव्हाण, उत्तम पवार, अशोक चव्हाण, राजू पवार, संजय चव्हाण, महेश पवार, मनोज पवार, सुभाष पवार आदी उपस्थित होते. यावेळी येथील नागरिकांनी अनेक समस्या व प्रश्न प्रलंबित असल्याचे घुले यांना सांगितले.
पुढे बोलताना डाँ.घुले म्हणाले की, शेखरभाऊ यांनी आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात विजेच्या सब स्टेशनची उभारणी केली.तेव्हा या भागामध्ये घरोघरी वीज पोहोचली.असे मागील दहा वर्षांमध्ये कुठलेही ठोस विकास काम या भागात झालेले नाही.देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे झाली तरी माणिकदौंडी परिसरातील दरी,डोंगरात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते,पाणी,वीज यासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळालेल्या नाहीत.हे पूर्णपणे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.यामुळे विकासाचा मोठा अनुशेष भरून काढावा लागणार आहे.मूलभूत सुविधांसह आजच्या युगातील अत्याधुनिक सुविधा फक्त शेखरभाऊ आमदार झाले तरच मिळू शकतात.याचा गांभीर्याने विचार येथील नागरिकांनी करायला हवा.तरच हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम पवार,सूत्रसंचालन विकास पवार,यांनी करून किरण पवार यांनी आभार मानले.
➡️:- माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुक सर्व ताकदीनिशी लढवणार असल्याचे जाहीर करून पक्ष व चिन्ह कोणतेही असेल परंतु थांबायचे नाही असे स्पष्ट संकेत दिल्याने घुले समर्थक व कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला असुन मागील काही वर्षांपासून शांत असलेले कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. घुलेंची यंत्रणा ही अनेक दिवसांनंतर तालुक्यात सक्रिय झाली असुन घुले यांच्या कडुन विविध कार्यक्रम व प्रत्यक्ष गाठीभेटी वर भर दिला जात आहे. त्यामुळे घुले पाटलांच्या बहुचर्चित खटक्याची चर्चा आता तालुक्याच्या राजकीय पटलावर चांगलीच रंगु लागली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!