आष्टी (प्रतिनिधी)आष्टी-कै.आनंदराव नारायण गजघाट(आबा)यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त जि.प प्राथमिक शाळा नांदा येथे वृक्षरोपण करून त्यांचा संस्कारक्षम जीवनपटाला उजळा देण्यात आला .
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही,
मानसे संपली तरी संबंध मिटत नाही,
शरीर गेले तरी आठवणी संपत नाही,
कर्तुत्वाचे देणे फीटता फीटत नाही या युक्तीप्रमाणे समाजाला देण्याची उदात्त धारणा कायम जीवनात अंगे करणारे कैलासवासी आनंदराव नारायण गजघाट(आबा)यांच्या पुण्यस्मरणनिमित्त शाळेच्या कायम उपयोगी पडतील अशी कढीपत्ता व लिंबोणीचे झाड लावण्यात आले. वृक्ष हीच त्या माणसाची आठवण आहे या भूमिकेतून हा नवीन उपक्रम सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किरण जावळे यांच्या संकल्पनेतून नांदा गावामध्ये अस्तित्वात आला या कार्यक्रमासाठी
उपस्थित बबनराव औटे नाना भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष,सरपंच नानासाहेब औटे,अंबादास औटे सर,माजी सरपंच राधाकृष्ण औटे,ग्रा.पं.सदस्य शंकर औटे,कल्याण औटे पाटील,सरोदे सर,शिंदे सर,पत्रकार किरण जावळे आदी उपस्थित होतो