पाथर्डी (प्रतिनिधी):- आजच्या स्पर्धेच्या युगात पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हे स्काॅलरशीप, हेडगेवार प्रज्ञाशोध, मंथन सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये शहरी मुलांपेक्षा ही चांगले उज्ज्वल यश मिळवतात ही नक्कीच भुषणावह बाब आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व अत्यंत कमी साधन सुविधा असताना असे उत्तुंग यश मिळविण्यामागे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्या बहुमोल परिश्रमाचा वाटा असतो. असे गौरवोद्गार केंद्र प्रमुख राजेंद्र बागडे यांनी काढले.
ते शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एकनाथ ढोले होते. यावेळी मार्गदर्शक शिक्षक प्रवीणा गोल्हार, सुधीर पगारे, स्मिता थोरहत्ते, प्रसाद मरकड, बंडु गाडेकर, सुरज आव्हाड, सोनाली सोनवणे, अनिता सोनवणे, सौ सुनिता गोसावी यांच्यासह पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ढोले म्हणाले की,
आपल्या विद्यालयाच्या उज्वल यशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा आणखी एक उज्वल यशाचा मानाचा तुरा रोवला गेला असुन यावर्षी
झालेल्या डॉ. हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षेत आपल्या विद्यालयातील तब्बल ९ यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यानी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
गुणवंत विद्यार्थी – इयत्ता ७ वी तील विद्यार्थी अनुष्का आंधळे जिल्ह्यात ५वी, सर्वज्ञा रोडी जि.१५वी तर संयम खाटेर जिल्ह्यात २१वा
इयत्ता ४थीतील विद्यार्थी सार्थक आव्हाड जिल्ह्यात १२ वा., अगस्त्य आंधळे जि.१२ वा, वल्लभ जोशी जि.१३वा., स्वराज बांगर जि.१६वा, काव्या पालवे जि.२०वी, अदिती साबळे जि.२१वी,
या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ भांडकर व अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.