आष्टी(प्रतिनिधी)इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन आय इ डी एस एस ए पुणे यांच्या वतीने नुकत्याच छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज आष्टी च्या संघाने हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये स्थान मिळवले आहे ही स्पर्धा छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व डिप्लोमा इंजीनियरिंग तसेच डिप्लोमा फार्मसी महाविद्यालय यांच्या अंतर्गत खेळवण्यात आल्या होत्या या सर्व संघास निम्या पॉईंटच्या फरकाने हरवत सुवर्ण पदक पटकावले व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये स्थान मिळवले आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ भीमराव धोंडे यांनी हॉलीबॉल टीमचे कॅप्टन श्रीयश ढोले, खेळाडू ओंकार कदम,अकिब शेख, साहिल जाधव,ओंकार जाधव,अमीर जयदी,ओमकार वाटोळे,निरज तायडे, रोहित राऊत,पृथ्वीराज ठाकूर,अभिजीत देसाई, ऋषिकेश चव्हाण,हॉलीबॉल टीमचे कोच प्रा.योगेश पवार , प्रा.वनवे यांचा सत्कार करुन संघाचे अभिनंदन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत, शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय बोडखे, प्राध्यापक यांनी ही संघाचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .