पाथर्डी (प्रतिनिधी):- भगवान शिवशंकरास प्रिय असलेल्या बेल वृक्षाच्या छायेत साक्षात शिवलिंगाची स्थापना होणे हे गावातील व परिसरातील सर्वांसाठी परमभाग्याचा क्षण आहे. याठिकाणी होणारी महादेवाची सेवा, साधना व पुजा ही अनेक पटीने पुण्यदायी व फलदायी ठरते. परमेश्वराच्या पुजे एवढीच घरातील आई वडीलांची सेवा ही श्रेष्ठ असते. मातापित्यांची सेवा केली तरच परमात्म्याची पुजा फलदायी ठरते. असे प्रतिपादन शंकर महाराज मठाचे मठाधिपती महंत माधव बाबा यांनी केले.
पाथर्डी शहरातील साईनाथनगर येथे श्री ओंकारेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अरविंद पारगावकर, उद्योजक अमोल बडे, प्रमोद खाटेर, डॉ. धनंजय फळे, प्रा.प्रकाश शेवाळे, गणेश वराडे, रमेश भंडारी सर, उत्तमराव गर्जे, अविनाश दौंड, कृष्णा खेडकर, बाळासाहेब बडे, सुनील शहाणे, नवनाथ बडे गुरुजी, सोमनाथ उणबेग, दत्तप्रसाद पालवे, महादेव सोनवणे, सोनवणे साहेब, रवींद्र जोशी, श्रीमती रोहिणीताई पालवे, यांच्यासह साईनाथनगर मधील रहिवासी उपस्थित होते.
या दोन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथुन आणलेल्या शिवलिंग व नंदी महाराज मूर्तींची या निमित्ताने वाद्यांच्या निनादात व फटाक्यांची आतिषबाजीत परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साईसेवा महीला भजनी मंडळाच्या उपस्थितीने या शोभायात्रेला रंगत आणली. शनिवारी व रविवारी होम हवन, मूर्ती न्यास, दर्शन विधी, मुर्ती स्नान, अभिषेक, जलाधारी कलश, त्रिशुल, घंटा, ध्वजारोहण तसेच मुख्य ओंकारेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय मंगलमय, धार्मिक व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न सचिन देवा देशपांडे यांनी केले. तर डॉ. धनंजय फळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी साईनाथनगर मधील नागरिकांनी व युवकांनी तन मन धनाने सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिमल बाबर, विस्वास पालवे, शंकर उदबत्ते, वैभव खुटाळे, मुन्ना पडधरीया, बंटी भागवत, गणेश रोकडे, महेश दौंड, किशोर गायकवाड, राजेंद्र पाखरे, महेश वाघमोडे, सचिन दौंड, गजानन भंडारी, आनंद रेदासनी, गणेश पालवे, दिपक फलके, ॠषीकेश मुळे, राहुल ढाकणे आदींनी परिश्रम घेतले.