आष्टी (प्रतिनिधी) तो काळ अजूनही आठवला तर अंगावरती शहारे येतात… तो काळ साधारण 2005/2006 चा होता.अण्णा नुकतेच भाजप सोडून राष्ट्रवादीत आले होते.अण्णाची जवळचे बरेच कार्यकर्ते अण्णांना सोडून गेली होती.मी इयत्ता 11वी मध्ये शिकत होतो.साधारण सप्टेंबर चा महिना चालू होता.14 सप्टेंबर 2005 वार बुधवार होता. अचानक माझ्या वडिलांच्या छातीमध्ये चमक निघण्यास सुरुवात झाली… तसे माझे वडील खूप भित्र्या मनाचे होते. तसं पाहिलं तर आमच्या देऊळगाव घाट मध्ये स्थानिक डॉक्टर नसल्यामुळे, माझे वडील करंजी घाट येथील डॉक्टर पालवे यांच्याकडे गेले. डॉक्टरने पूर्ण तपासणी केली, व तपासणी अंती अहमदनगरच्या डॉक्टर सानप यांची चिठ्ठी दिली. व अहमदनगरला जाण्याचा सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी माझे वडील व आजोबा अहमदनगरच्या हृदयरोग तज्ञ डॉक्टर सानप यांच्याकडे गेले. डॉक्टरांनी हृदयाची पूर्ण तपासणी करून, तपासणी अंती वडिलांना सांगितले की, तुमचे दोन्हीही वाल निकामी झाले आहेत….. त्यामुळे तुम्हाला तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. आणि ऑपरेशनला साधारण 4 ते 5 लाख रुपये एवढा खर्च येईल. डॉक्टरांचे हे बोलणे वडिलांच्या कानावर पडतात…. वडिलांच्या पायाखालची जणू मातीच सरकली…. वडिलांना काय करावे हे सुचत नव्हते. कारण ऑपरेशन साठी 4 ते 5 लाख रुपये एवढा खर्च येणार असल्यामुळे, एवढा पैसा कुठून उपलब्ध करायचा, हा वडीला पुढे प्रश्न पडला होता….. वडील काहीतरी विचार करत होते…. तेवढ्यातच डॉक्टरांनी प्रश्न केला, तुम्हाला आजची आजच ऍडमिट व्हावे लागेल. आणि तुम्ही आज ऍडमिट झाले नाही तर, तुमच्या आयुष्यातील फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत म्हणून समजा. डॉक्टरांनी आपल्या उजव्या हाताचे दोन बोटे दाखवीत वडिलांना इशारा केला…..
तसं पहिल्यापासूनच माझ्या आजोबांना ऐकायला कमी यायचं. डॉक्टर आणि वडिलांमध्ये काय संभाषण चालू आहे, हे आजोबांना समजना. परंतु डॉक्टरांनी वडिलांना जे दोन बोटे दाखवली, त्या दोन बोटांचा अर्थ, कदाचित आजोबांनी दोन हजार रुपये लावला असावा. कारण डॉक्टरांना आजोबा म्हणाले की, आम्ही कुठूनही दोन हजार रुपये अनु, परंतु डॉक्टर तुम्ही माझ्या मुलाला नीट करा. डॉक्टरांनी आजोबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आणि वडिलांना डॉक्टर म्हणाले की, तुम्ही आत्ताची आत्ता ऍडमिट व्हा, आपल्याकडे वेळ शिल्लक नाही…. परंतु वडीलाकडे पैसे नसल्यामुळे, वडील ऍडमिट राहू शकले नाही. वडील संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्हाला ही बातमी समजली. ज्याप्रमाणे आकाशामध्ये वीज चमकावी, त्याप्रमाणे आमच्या काळजामध्ये धसssss… झालं. कारण पाच लाख रुपये कुठून आणायचे, हा यक्ष प्रश्न आमच्या कुटुंबावर ती पडला होता. कारण आमची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे, आम्ही हे पाच लाख रुपये एवढे पैसे जमवणे अशक्य होतं…
त्यावेळी आमच्या देऊळगाव घाट चे सरपंच संभाजी मस्के हे होते. त्यांना ही बातमी समजल्यावर ती, त्यांनी आमच्या कुटुंबीयांना एक प्रकारे आधार देण्याचं काम केलं. तुम्ही घाबरू नका सर्व काही ठीक होईल, आपण अण्णा कडे जाऊ हा शब्द त्यांनी दिला. त्यावेळेस प्रथम अण्णा….. हा शब्द आम्ही ऐकला होता. आम्ही तिसऱ्याच दिवशी अण्णा कडे गेलो, अण्णांना सर्व हकीगत सरपंचांनी सांगितले. अण्णांनी क्षणाचाही विचार न करता, आपल्या पि. ए. ला पाच लाख रुपयाचे पत्र आमदार फंडातून देण्याचे सांगितले. त्यावेळेस अण्णांचे पी.ए. पवार हे होते. अण्णांनी आम्हाला पाच लाखाचे पत्र तात्काळ दिले. त्यामुळे माझ्या वडिलांचे ऑपरेशन, आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर येथे फुकट होऊ शकले.
ज्या डॉक्टरनी माझ्या वडिलांना, दोन दिवसाची मुदत दिली होती, तेच माझे वडील पुढे 17 वर्ष जगू शकले. ते फक्त अण्णामुळेच… आम्ही हे अण्णांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या वडिलांना जे 17 वर्षाच बोनस आयुष्य भेटलं, ते फक्त अण्णा आणि अण्णा मुळेच…. मित्रांनो मी देव बघितला नाही, परंतु माणसातला देव माणूस सुरेश अण्णांच्या रूपाने नक्कीच बघितला…. अशा या देव माणसाला आमच्या ठोंबरे कुटुंबीयांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!
……. सदैव आपला ऋणी..
….. ठोंबरे आदिनाथ माणिक, देऊळगाव घाट