spot_img
spot_img

चैतन्य स्वामी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह.भ.प.बाळू महाराज गिरगांवकर यांच्या भागवत कथेला अलोट गर्दी

देवळाली (प्रतिनिधी):- सालाबादप्रमाणे याही वर्षी देवळाली येथे श्री चैतन्य स्वामी पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झालेली आहे दि.२९जाने २०२४ पासून श्रीमद् भागवत कथा दररोज दुपारी २ते५ या वेळेत प्रसिद्ध श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प. श्री. बाळू महाराज गिरगांवकर यांच्या रसाळ वाणीतून सुरू आहे ही कथा श्रवनासाठी स्वामीभक्तांची अलोट अशी गर्दी होत आहे तसेच रात्री९ते११या वेळेत नामवंत किर्तनकारांची कीर्तने होणार आहेत कीर्तन व भागवत कथा श्रवनाचा लाभ आपण सर्वानींही घ्यावा असे आवाहन देवळाली ग्रामस्थांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली येथे सुरू असलेल्या श्री चैतन्य स्वामी पुण्यतिथी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी होत असून श्रीमद् भागवत कथा श्रवनाचा लाभ घेत आहेत या सप्ताहात बुधवार दि ३१जाने रोजी रात्री ९ते११ या वेळेत ह.भ.प श्री गोविंद महाराज जाटदेवळेकर(भागवताचार्य ) यांचे हरिकीर्तन होईल.गुरूवार दि१\२\२०२४ रोजी रात्री ९ते११ या वेळेत ह.भ.प साध्वी सोनाली ताई करपे (चकलांबा) यांचे हरिकीर्तन होईल. शुक्रवार दि२\२\२०२४ रोजी रात्री ९ते११ या वेळेत ह. भ.प श्री अक्रूर महाराज साखरे यांचे हरिकीर्तन होईल. शनिवार दि३\२\२०२४ रोजी रात्री ९ते११ ह.भ.प शांतीब्रम्ह श्री महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे हरिकीर्तन होईल. रविवार दि ४\२\२०२४ रोजी रात्री ९ते११ या वेळेत ह.भ.प श्री. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांचे हरिकीर्तन होईल .तर सोमवार दि ५\२\२०२४ रोजी सकाळी ९ते११ वा ह.भ.प श्री आदिनाथ महाराज शास्त्री (श्री क्षेत्र तारकेश्वर) गड यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक होईल मिरवणूकीचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध शाळेमधून आलेले लेझीम पथक हे आहे. नंतर महाप्रसाद होईल या काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांचे चिरंजीव यशभैय्या आजबे (युवानेते) हे आहेत तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवळाली ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!