पाथर्डी (प्रतिनिधी): – संघर्ष व प्रामाणिक कष्ट जितके जास्त तितके उच्च प्रतीचे यश प्राप्त होते. संघर्षातून माणूस घडला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात भरपूर अभ्यास करून स्वतःचे व आई वडिलांचे नाव लौकिक करावे.प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास हालाखीच्या परिस्थितीवर मात करता येते असे झी सोनी टीव्ही सारेगमप लिटिल चॅम्प्स २०२३ विजेती कु. गौरी अलका पगारे हिने व्यक्त केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी येथे नुकतेच उत्साहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अडवोकेट सुरेशराव आव्हाड होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सारेगम लिटिल चॅम्प २०२३ विजेती गौरी अलका पगारे, संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, मैत्रीय ग्रुपच्या अध्यक्षा व संस्थेच्या सदस्या कविताताई अभय आव्हाड, सदस्य महावीर मुनोत, अलका पगारे,मा.मुख्याध्यापक रामनाथ फुंदे, मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत घारे,दिगंबर गाडे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख दुर्गा भगत व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. यावेळी अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कु. गौरी पगारे हिला रोख पारितोषिक देण्यात आले.
विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्राविण्य स्पर्धा परीक्षा तसेच राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त विद्यार्थी यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद मेढे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना दराडे ,रेश्मा सातपुते व वर्षा ढाकणे यांनी तर आभार दुर्गा भगत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत सरोदे, विठ्ठल धस, रावसाहेब मोरकर,प्रमोद हंडाळ, संदीप आव्हाड, सतीश डोळे, सतीश बोरुडे, अक्षय भंडारी, तुषार शिंदे, संदीप धायतडक, महिंद्र तांदळे, जयश्री एकशिंगे, मनीषा गायके, आशा बांदल, राधिका सरोदे, जयश्री दगडखैर, ज्योती हम्पे,आजिनाथ शिरसाट,बाळू हंडाळ, आदिनाथ फाजगे व कैलास भोसले यांनी परिश्रम घेतले.