spot_img
spot_img

चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळ्याचा उद्या होणार वीणा पुजनाने प्रारंभ

देवळाली (प्रतिनिधी) -आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबाद प्रमाणे प.पू.ब्र.भू.सदगुरू श्री स्वामी चैतन्यानंद महाराज यांचा ५३ वा पुण्यतिथी सोहळा उद्यापासून मोठ्या उत्साहात सुरू होणार असून दि. २९ जानेवारी ते दि.०५ फेब्रुवारी या कालावधीत श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प.पू.ब्र.भू .सदगुरू श्री. चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा सोमवार दि.२९ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरु होत आहे दि २९ रोजी सकाळी ९ वा प.पू .स्वामींची प्रतिमा ,ग्रंथ आणि भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प.बाळू महाराज गिरगांवकर यांची भव्य मिरवणूक निघेल नंतर संत महंत व मान्यवरांच्या हस्ते वीणापूजन होऊन पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८विष्णू सहस्त्रनाम,गीता अध्याय, प्रार्थना, पसायदान,८ ते ८:३० संत पूजा, सकाळी ९ ते ११ गाथा भजन,दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा भागवताचार्य ह.भ.प.बाळू महाराज गिरगांवकर यांच्या रसाळ वाणीतून संपन्न होईल,६ते ७हरिपाठ, रात्री ७:३० ते ८नाम जप, सोमवार दि.२९ जानेवारी रोजी रात्री ९ ते११ या वेळेत ह.भ.प.श्री.भागवत महाराज उंबरेकर (श्री क्षेत्र वृध्देश्वर) यांचे हरिकीर्तन होईल मंगळवार दि.३० जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल (अध्यक्ष,मदन महाराज संस्थान कडा)यांचे हरिकीर्तन होईल बुधवार दि.३१जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे हरिकीर्तन होईल, गुरूवार दि.०१ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.साध्वी सोनालीताई करपे(चकलंबा)यांचे हरिकीर्तन होईल,शुक्रवार दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते११ ह.भ.प.श्री.अक्रुर महाराज साखरे यांचे हरिकीर्तन होईल शनिवार दि.३फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.शांतीब्रह्म श्री.महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे हरिकीर्तन होईल रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांचे हरिकीर्तन होईल सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते११ ह.भ.प.श्री आदिनाथ महाराज शास्त्री (श्री क्षेत्र तारकेश्वरगड)यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक निघेल या मिरवणूकीमध्ये चैतन्य स्वामी भजनी मंडळ तसेच हलगी पथक,विविध शाळेचे लेझीम पथक सहभागी होणार आहेत मिरवणूकी नंतर काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते आ.बाळासाहेब आजबे(काका)यांचे चिरंजीव यश बाळासाहेब आजबे हे आहेत या काल्याच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक संत महंत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहास उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी देवळाली ग्रामस्थांची नम्र विनंती आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!