spot_img
spot_img

प्रसिद्ध सिने अभिनेते, संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सोमवारी पाथर्डीत ॲड प्रताप ढाकणे यांच्या युवा संवाद अभियानाचा समारोप

पाथर्डी (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी महिनाभरापासून सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी सकाळी. ११:०० वा. प्रसिद्ध सिने अभिनेते व राष्ट्रवादीचे फायर ब्रँड खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे समारोप होणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महारूद्र किर्तने व युवक शहराध्यक्ष देवा पवार यांनी दिली.
अधिक माहीती देताना किर्तने व पवार म्हणाले ,ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील महाविद्यालयात जात महाविद्यालयीन तरूण तरूणींशी संवाद साधला महाराष्ट्रातील व देशातील आजची राजकिय, समाजीक,शैक्षणिक परिस्थिती आणि त्याचा भविष्यात होणारे परिणाम या सर्व घडामोडीमुळे आजचे विद्यार्थी जेंव्हा व्यावसायिक जीवणात पदार्पण करतील त्यावेळी त्यांच्या समोरील संभाव्य समस्यांचा उहापोह ढाकणे यांनी महिन्याभरात केला. आज वाढती बेरोजगारी, शासकिय नोकर भरतीतील सावळा गोंधळ यामुळे तरूण व तरूणींमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. याच सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी ॲड.प्रतापराव ढाकणे दोन्ही तालुक्यातील जवळपास चाळीस महाविद्यालयातील हजारो विद्यार्थांशी संवाद साधला.याला प्रचंड प्रतिसाद लाभला या आभियानाच्या समारोपासाठी व तरूणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शन पाथर्डी शहरातील स्व. माधवराव निऱ्हाळी खुल्या नाट्यगृहात सोमवारी दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ११.00 वा. युवा महासंवाद समारोप सोहळा आयोजीत करण्यात आला असून सर्वांनी यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी किर्तने व पवार यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!