पाथर्डी (प्रतिनिधी):-शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. आजच्या स्पर्धात्मक वातावरणामुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आपले जीवन घडवतात अशा कार्यक्रमातून विद्यार्थी अभिनय नृत्य, दिग्दर्शन, संगीत यासारख्या कलेत पारंगत होतात असे मत पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी व्यक्त केले.
श्री विवेकानंद विद्यामंदिर या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांचा नृत्य अविष्कार पाहून पाथर्डीतील पालक प्रेक्षकांची व रसिकांची विद्यार्थ्यांनी वाहवा मिळवली.
या सांस्कृतिक कार्यक्रमात समाज प्रबोधनपर अनेक नृत्य, थीम सादर करण्यात आल्या. यामध्ये गणेश वंदना, महाभारत थीम, श्रीराम प्रभू कथानक नृत्य थीम ,देशभक्ती नृत्य , खंडोबाची गाणी, राजस्थानी- गरबा नृत्य, मोबाईल एडिक्शन थीम, छत्रपती शिवाजी महाराज कथानक थीम, शेतकरी जीवन थीम ,एज्युकेशन थीम हॉरर नृत्य व मनोरंजक गाणी सर्वच कार्यक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी पाथर्डीकरांना मंत्रमुग्ध केले. राम सियाराम या कथात्मक गाण्यावर तर उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरला.
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहरातील हजारोंच्या संख्येने पालक व प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, आरोग्य माता केंद्राच्या अधीक्षक ज्यूली मॅडम, शीला मॅडम व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन निमकर, डॉ. ज्योती देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे, अमोल आव्हाड, मा. नगरसेवक महेश बोरुडे, प्रवीण राजगुरू, मुख्याध्यापक शरद मेढे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके,पर्यवेक्षक संपत घारे व पालक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल गर्जे, श्रावणी खेडकर श्रावणी, श्रेया खेडकर, आकांक्षा पाठक, ज्ञानेश्वरी साबळे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक राठोड,दुर्गा भगत,अर्चना धायतडक,माधुरी रणदिवे,जयश्री खोर्दे,रजनी भोईटे, सोनिका वखरे,अर्चना दराडे ,रत्नमाला सांगळे, अनिता केदार, गार्गी तरवडे,विठ्ठल धस,शशांक महाजन, अक्षय भंडारी, दादासाहेब उदमले, योगेश इधाटे, ऋषिकेश मुळे व इतर शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.