पाथर्डी (प्रतिनिधी)पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील न्यु इंग्लिश स्कूल आल्हणवाडी येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापक दहातोंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शाळेमध्ये घेतलेल्या क्रीडा सप्ताह मध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गीतांवर नृत्य सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली ,तसेच भाषणे केली.यावेळी अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक दहातोंडे सर होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच परमेश्वर गव्हाणे पाटील, माजी सरपंच मच्छिंद्र गव्हाणे पाटील,माजी उपसरपंच राधाकिसन कर्डिले पाटील ,श्री महादेव गव्हाणे,मेजर नाथा फुंदे व आण्णासाहेब औटे पाटील हे होते. दहातोंडे सर व फुंदे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले तसेच फुंदे सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह पालक , ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते