कडा (प्रतिनिधी) आजच्या तरूण पिढीचे मोबाईल मुळे फार मोठे नुकसान होत आहे, आज मोबाईल मुळे घरात सुद्धा कोणी कोणाला बोलण्यास तयार नाही मोबाईल वर बोलता बोलता अपघात देखील भरपूर होतात तरी याला कोठेतरी आळा बसणे गरजेचे आहे . तरूण मुलांनी मोबाईल च्या आहारी न जाता काम धंद्याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे संत भगवान बाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रम निमित्त शुक्रवारी श्री ह. भ .प शंकर महाराज शेवाळे यांचे हरीकीर्तन झाले, यावेळी ते बोलत होते,आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर तो अगोदर विचारतो छोटी पीनच चार्जर आहे का , या मोबाईल मुळे आपण एवढे भिकारी झालो, तरूण पिढीचे तर विचारूच नका संडासला सुद्धा मोबाईल लागतो , आणि तो तेथूनच मेसेज पाठवतो शुभ सकाळ अशी अवस्था तरुण पिढीची झाली आहे . या तरुणांना सुधारण्याची गरज आहे , दिवसभर मोबाईल चार्जिंग टिकण्यासाठी त्याला आर्धा तास चार्ज करण्याची गरज असते, तशी मनुष्याला वर्षभर जीवन जगण्यासाठी कीर्तनाच्या चार्जींगची गरज असते असेही ते म्हणाले. किर्तनानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.