कडा ( प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावातील जागरुक देवस्थान म्हणजे खंडेश्वर संबोधले जाते सुलेमान देवळा हे गाव कोणतेही श्रेत्र असो नेहमीच चर्चेत राहिलेले आहे येथील खंडेश्वर देवस्थानाच्या यात्रेला प्रत्येक जाती धर्माचे व पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित राहतात हा उत्सव ढोल ताशा लेझिम पथक तसेच डीजे तमाशा, कुस्त्यांचा हगामा या साऱ्या उपक्रमाने रंगत असतो…
विशेष म्हणजे सुलेमान देवळा या गावातील तरुण कावडी घेऊन श्री क्षेत्र पैठण व वृद्धेश्वर येथे पाणी आणण्यासाठी पायी जातात. यात्रेदिवशी अगदी वाजत गाजत या तरुणांचे स्वागत केले जाते तसेच मिरवले पण जाते. त्यानंतर कावडीवाले तरुण गावातील सर्व देवी देवतांना सोबत आणलेले पाण्यांने अभिषेक घालतात. दुसऱ्या दिवशी कुस्ती हगामा भरवला जातो. अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने या दोन दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो…
या उत्साहात सर्व जातीय तेढ व राजकीय विरोध विसरुन प्रत्येक जण या उत्साहात सामील होत असतो.