पाथर्डी (प्रतिनिधी):- येत्या 22 तारखेला आयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यानिमित्त घराघरातून दिवाळी साजरी होऊन गोडधोड प्रसाद घरोघरी व्हावा यासाठी हरभरा डाळ व साखरेचे वाटप नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात केले जात आहे. या दिवशी शहरात प्रभाग निहाय गृहसजावट व उत्सवाचे फोटो व्हाट्सअप वर पाठवावे त्यातील उत्कृष्ट गृह सजावट व उत्सवाची घरात राबवलेली कल्पना याचे क्रमांक प्रभाग निहाय काढले जातील. त्यातील विजेत्यांच्या घरातील दोन व्यक्तींना प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आयोध्या येथे पाठविले जाईल. अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
शहरातील फुलेनगर खोलेश्वर मंदीर, माधवराव निराळी खुले नाट्यगृह, हंडाळवाडी, तनपुरवाडी आदी विविध ठिकाणी रामाचा प्रसाद करण्यासाठी शिधावाटप कार्यक्रम व विकास कामाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, रामनाथ बंग, मृत्युंजय गर्जे, अजय भंडारी, अजय रक्ताटे, प्रतीक खेडकर, सुभाष बर्डे, महेश बोरुडे, मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, मंगल कोकाटे, बंडू बोरुडे, अमोल गर्जे रमेश गोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजळे म्हणाले की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये विखे यांच्या रूपाने एक सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला असून विविध विकास कामांमध्ये नगर दक्षिण मतदार संघ आघाडीवर आहे. महायुतीच्या राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विखे यांच्या रूपाने मोठा निधी मतदार संघामध्ये येण्यास मदत झाली. त्यामुळे मतदार संघात विविध विकासकामे मार्गी लागली. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपला साथ द्यावी. येत्या 22 तारखेला घरोघरी आनंदोत्सव साजरा करावा. परिसरात स्वच्छता अभियान राबवावे. असे आवाहन यावेळी राजळे यांनी केले.
यावेळी स्वतः खासदार विखे यांनी उभे राहून नागरिकांना शिधावाटप केले. तर विखे यांच्या सोबत उभे राहत युवा नेते प्रशांत शेळके, प्रसाद आव्हाड, प्रतीक खेडकर, रामनाथ बंग, महेश बोरुडे बबन सबलस यांनी शिधावाटपासाठी मोठे सहकार्य केले.