spot_img
spot_img

नारीशक्तीचा सन्मान करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य – सिनेअभिनेत्री अनिता दाते

पाथर्डी (प्रतिनिधी) :- अष्टभुजा, चतुर्भुजा ही नारी शक्तीची पौराणिक रुपे असली तरी स्त्रीयांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्य व कलागुणांची ती प्रतीके आहेत. नारी शक्तीच्या सन्मानासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करावी. आपल्या स्वाभिमानासाठी महिलांनी आपल्यातील कौशल्याचा वापर करावा. शिक्षण व समानता याची गरज महिलांसाठी असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते यांनी केले.
मकर संक्रांती निमित्त ॲड.प्रतापराव ढाकणे यांच्या वतीने शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे, प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, शेवगावच्या माजी नगरसेविका ज्योती बडधे, ज्योती बोरूडे, शेवगांवच्या माजी पंचायत समिती सभापती मंगल काटे, माजी जिल्हा परिषद सदस्या उज्वला शिरसाट, आरती निऱ्हाळी, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता भापकर, मनिषा ढाकणे, ज्योती जेधे, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, सौ.निशा प्रसादराव मते, सौ.कविता संतोष मुटकूळे, महिला बाल विकास अधिकारी अंजली आहेर, बेबीताई केळगंद्रे, सौ.सुमन खेडकर, सौ.दिपाली बंग, आदी उपस्थित होत्या.
अनिता दाते म्हणाल्या की, महिला ही अष्टभुजा अवतारी आहे घर, प्रपंच संभाळताना प्रत्येक क्षेत्रात ती यशस्वीरित्या ती जबाबदारी पार पाडते. त्यामुळे महिलांना कमी लेखु नका. आमच्यात प्रचंड कल्पकता असून, पुरूषप्रधान संस्कृती आता कालबाह्य झाली आहे. आज समाजात महिला या पुरूषांच्याही पुढे एक पाऊल आहेत. फक्त आजच्या तरूणांना महिलांचा सन्मान शिकवण्याची मोठी गरज आहे. पाथर्डी तालुक्यात ढाकणे कुटुंबीयांचा तीन पिढ्याचा मोठा इतिहास असून राजकारणा सोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये ही ते नेहमी अग्रेसर असतात. म्हणूनच मी इथे आले. पाथर्डी तालुका संताची भूमी आहे ज्या संतांनी सामाजाला समानता शिकविली म्हणजेच भेद बाळगू नये असा संदेश दिला त्यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. असे त्या वेळी शेवटी म्हणाल्या.
यावेळी ऍड प्रताप ढाकणे व सौ प्रभावती ढाकणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन अपर्णा शेळगांवकर व गणेश सरोदे यांनी केले तर आभार ज्योती बोरूडे यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!